कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा एका कैद्याचा खून (killed) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटातील मारहाणीत एका कैद्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रेनेजवर झाकण्यात येतो त्या झाकणाने पाच कैद्यांनी मारहाण करून कैद्याचा खून (killed) केल्याची घटना समोर आली आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याची हत्या (killed) झाल्याची माहिती समोर आली आहे.(Mumbai blasts accused killed in jail)
कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता . मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असून आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा खून करण्यात आला आहे. न्यायालयीन बंदी असलेल्या आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेशा पाटील, दीपक नेताजी खोत,संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने मुन्नाला मारहाण केली . या हल्ल्यात मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये कळंबा कारागृहात कैद्यांकडे थोडे ८० पेक्षा जास्त मोबाईल आढळल्याची माहिती आहे. या प्रकरणी कारागृहातील दोन अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई देखील करण्यात आली होती . तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती .