27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरक्राईमइराण्यांच्या वस्तीत घुसून पोलिसांची जिगरबाज कामगिरी

इराण्यांच्या वस्तीत घुसून पोलिसांची जिगरबाज कामगिरी

आंबिवली (Ambivali) मधील इराणी वस्ती (Irani Wasti) ही फार पूर्वीपासून चोरांची वस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अनेक कुप्रसिद्ध इराणी आरोपींचे वास्तव्य असून ते राज्यभरात कोणत्याही जिल्ह्यांमध्ये जाऊन चेन स्नॅचिंग, बतावणी, फसवणूक, घरफोडी असे गुन्हे करतात. या इराणी दरोडेखोरांची मोठी दहशत आहे. पोलिसही जिथे जायला घाबरतात. त्या आंबिवलीतील चोरट्यांच्या इराणी वस्तीची कथा ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) हवा असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 च्या पथकाने थरारक कामगिरी करत शनिवारी (दि. ४) रोजी आरोपीला अटक केली. मोहम्मद जाकिर फर्जंद सय्यद उर्फ संगा (रा, आंबिवली, कल्याण) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र, गजरात तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये चोरी, बतावणीचे जवळपास २७ गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये गुजरात पोलिसांनी मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाईतून तो जामिनावर सुटलेला आहे. अटक आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एम.एच.बी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली. (Mumbai Police arrested the accused from Irani Wasti in Ambivali)

मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 11चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांच्या पथकाला ही मोहीम सोपविली होती. पवार यांनी खबऱ्यामार्फत आरोपीचा ठावठिकाणा शोधला असता तो शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान इराणी मस्जिदीच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवर येणार असल्याची पक्की खबर मिळाली. या ठिकाणी कारवाई करणे अत्यंत धोकादायक असल्याने चारकोप बोरवली आणि मालाड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक देखील सोबतीला घेऊन सापळा रचला. पोलिसांची तगडी कुमक तसेच 2 रुग्णवाहिका, चालक, 3 कांदिवली पोलीस मित्र असे एकूण 26 जणांची तीन वेगवेगळी पथके बनविली.

संपूर्ण तयारीने हे पथक शनिवारी इराणी वस्तीत गेले असता, वस्तीतील लोका आणि महिलांनी दंगा केला. यावेळी पोलिसांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पथकाने आरोपीला पसार होताना पाहिले. यावेळी पोलिस पथकाने सोबत आणलेल्या खासगी वाहनातून आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडले. यावेळी तेथील लोकांनी पोलिसांना घेराव घालून त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी पोलिसांची तिन्ही पथके एकत्र आली आणि लोकांना आणि महिलांना आवरण्याचा प्रयत्न करु लागली मात्र त्या लोकांनी पोलीस पथकावर जीवघेणा हल्ले करण्यास सुरुवात केली.

अशाही अवस्थेत पोलिसांनी आरोपीला पळून जाण्याचा मोका दिला नाही. जळपास ८०० मीटर पर्यंत पोलिसांनी त्याला उचलून आणले आणि रुग्णवाहिकेत घातले. त्यावेळी इराणी वस्तीतील लोकांनी रुग्णवाहिका चालकाला देखील मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी दुसरी छोटी रुग्णवाहिका तेथे आणली आणि त्याला चपळाईने दुसऱ्या रुग्णवाहिकेत घातले. तसेच सोबत आणलेल्या खासगी वाहनात पोलीस पथकातील लोक दाटीवाटीने बसले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने पोलिसांच्या वाहनांवर जोरदार हल्ले सुरु झाले. मात्र कुठेही न थांबता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत कामगिरी फत्ते केली.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळेंचे एकनाथ शिंदेंना पत्र!

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

कोस्टल रोडला लता मंगेशकरांचे नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची मागणी

आरोपीला पकडण्यासाठी असा केला मास्टर प्लॅन
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन रुग्णवाहिका आणि दोन खासगी वाहनांचा वापर केला. तसेच सोबत पिस्तुल, लाढ्या, हातकडी घेतली. पोलीस पथकाच्या २६ जणांच्या एका पथका एवजी तीन पथके करण्यात आली. पहिले पथक इराणी वस्तीतील इराणी वस्तीतील मच्छीमार्केटमध्ये रुग्णवाहिका आणि रिक्षासह थांबेल असे ठरले. दुसरे पथक अटली कोळीवाडा येथे रुग्णवाहिका आणि एका खासगी वाहनासह थांबेल असे ठरले. तर तिसरे पथक खबऱ्याच्या माहितीनुसार आपली चाल ठरवेल असे ठरले. त्यानंतर खबऱ्याच्या माहितीनुसार ही तिन्ही पथके इराणी वस्तीच्या मस्जिद जवळील चहाच्या टपरीवर येतील व सदर आरोपीस ताब्यात घेतील असे ठरले.
त्यावेळी पोलिसांवर हल्ला झाल्यास तिसरे पथक त्यांचा प्रतिकार करेल आणि दोन नंबरचे पथक आरोपीला रुग्णवाहिकेतून ताब्यात घेईल आणि तीन नंबरचे पथक आरोपीला वस्तीतून बाहेर काढण्यासाठी रस्ता मोकळा करले. जाताना वेगवेगळ्या मार्गाने तीन पथके येतील मात्र बाहेर पडताना रेल्वे फाटकातून बाहेर पडायचे आणि रेल्वे फाटक बंद असल्यास यु टर्न मारुन आलेल्या मार्गाने बाहेर पडतील असा प्लान तयार केला. दरम्यान खबऱ्याने आरोपी पांढरा शर्ट घालून चहाच्या टपरीवर आल्याची खबर मिळताच पोलिसांच्या पथक रुग्णवाहिका घेऊन तिकडे रवाना झाले. त्याचवेळी आरोपीला कुणकुण लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

इराणी वस्ती अट्टल गुन्हेगारांसाठी प्रसिद्ध

आंबिवली मधील इराणी वस्ती ही फार पूर्वीपासून चोरांची वस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. चोऱ्या करून पैसे कमावणे हे यांचे मुख्य काम आहे. इतकेच नाहीतर यांना अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यासाठी घरातील महिला देखील त्यांना पाठिंबा देतात. या इराणी वस्तीमध्ये आत्तापर्यंत कोणतेही पोलिसांनी येऊन येथील आरोपीस अटक करण्याचा प्रयत्न केल्यास वस्तीवरील सर्व महिला एकत्र येऊन पोलिसांवर दगडफेक करून विरोध करतात. कोणत्याही आरोपीताला इराणी वस्तू मधून कोणतेही पोलीस घेऊन जाऊ शकत नाहीत. यापूर्वी अनेक कारवायांमध्ये पोलिसांना इराणी गल्लीतून आरोपीला पकडण्यात अपशय आले आहे. इराणी वस्तीतील आरोपीला पकडायचे असल्यास त्याला गावाबाहेरच सापळा रचून अटक केली जाते. या गावात कोणी नवीन रहायला आल्यास त्याची खबर इराणी लोकांना मिळते. कोणी नवी गाडी घतल्यास, वस्तीकडे पोलिसांचे वाहन येत असल्यास तात्काळ त्याची खबर आरोपींना मिळते. या गावात प्रवेश करताना नदीवरील पूलावरुन जावे लागते. या पूलावर जाताना आरोपींचे खबरी लगेच गावात खबर पोहचवतात आणि आरोपी सतर्क होतात.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी