30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्राईमगांजा विक्री करणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. तब्बल 'इतक्या' किलोचा गांजा जप्त!

गांजा विक्री करणाऱ्यांच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. तब्बल ‘इतक्या’ किलोचा गांजा जप्त!

मुंबई पोलिसांनी मंगळवारी, (3 ऑक्टोबर) प्रशंसनीय कामगिरी करत मुलुंडमध्ये तब्बल 60 किलोहुन अधिक आणि सुमारे 24 लाखांहून जास्त किमतीचा गांजा जप्त केला आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचाजवळील इनोव्हा मोटार कार हस्तगत केली गेली आहे. आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी मुलुंड पोलिस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-7 हे पोलीस पथक कक्ष कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलुंड परीसरामध्ये काही संशयित इसम एका इनोव्हा मोटार कारमधुन फिरतांना आढळून आले. मुलुंड पश्चिम येथील वैशालीनगर बसस्टॉप जवळ कारमधून फिरत असताना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने त्यांचे वाहन थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये दोन मोठ्या नायलॉनच्या गोण्या आढळून आल्या. यावरुन पोलीस पथकाचा त्यांचावरील संशय आणखी बळावला. त्यांनी तात्काळ 2 पंचासमक्ष पंचनामा करून सदर नायलॉनच्या गोण्यांची तपासणी केली. तपासणीअंती, त्या गोण्यांमध्ये खाकी रंगाच्या सेलोटेपमध्ये गुंडाळलेले 6 गट्ठे मिळाले. त्या गठ्ठ्यांमध्ये तब्बल 60 किलो 592 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 24 लाखांहून अधिक किमतीचा गांजा आढळून आला.

हे ही वाचा 

विधान परिषद गाठणार शंभरी! आजी माजी सदस्यांसाठी होणार खास कार्यक्रम

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या दरात आता ‘एवढी’ कपात…

“राज्य सरकार सोडून सगळा महाराष्ट्र आजारी…” नांदेड घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले!

यासोबतच, पोलिसांनी गुन्ह्यात वापर करण्यात आलेली एक इनोव्हा कार देखील हस्तगत केली असून कारसहित एकुण 30 लाख 23 हजार 680 रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.

याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन मुलुंड पोलीस ठाणे येथे ताब्यात घेतलेल्या एकुण 4 आरोपीवर कलम 8 (क), 20 (ब) (2), 29 एन. डी. पी. एस. कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी मुलुंड पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तरुणाईमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. नशामुक्ती मंडळाकडूनही अनेक कार्यक्रमांद्वारे अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध जनजागृतीचे काम केले जाते. पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक याबाबत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी