29 C
Mumbai
Wednesday, March 22, 2023
घरक्राईमनायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

नायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीड जिल्ह्यात एका नायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याला पेट्रोल (petrol) टाकून जाळण्याचा प्रयत्न (attempted to burn) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून महिला अधिकारी बचावल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणात तातडीने तपास सुरू केला आहे. (Naib Tehsildar woman officer attempted to burn by pouring petrol)

या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आशा वाघ असे असून त्या केज तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार आहेत. शुक्रवारी (दि. २०) रोजी नायब तहसीलदार आशा वाघ या घरुन जेवन करुन दुचाकीवरुन कार्यालयात जात होत्या त्यावेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला त्यातून उतरलेल्या चार हल्लेखोरांनी आशा वाघ यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले. मात्र या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या. आशा वाघ यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्लेखोर देखील फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

यापूर्वी देखील झाला होता जीवघेणा हल्ला
नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर यापूर्वी देखील जीवघेणा हल्ला झाला होता. ६ जून २०२२ रोजी आशा वाघ यांच्यावर त्यांच्याच सख्खा भाऊ मधूकर वाघ याने कोयत्याने हल्ला केला होता. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. आज पून्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे केज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

एमपीएससीच्या जाहिरातीत ऑनलाईन त्रुटी, पदवीधरांचा जीव टांगणीला, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी : जातनिहाय जनगणना विरोधातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; बिहार सरकारला मोठा दिलासा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे रुपडे पालटणार; कसे असेल नवे अत्याधुनिक कॉम्प्लेक्स, काय होणार बदल?

शेतीच्या वादातून केला होता हल्ला
आशा वाघ आणि त्यांचा भाऊ मधूकर वाघ यांच्यात शेतीच्या कारणातून वाद सुरू होते. याच वादातून मधूकर वाघ याने त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जीव घेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी मधूकर वाघ याला अटक केली होती. सध्या मधूकर वाघ तुरुंगात आहे. मात्र आज पून्हा आशा वाघ यांच्यावर हल्ला झाल्याने हल्ला करणारे ते चार हल्लेखोर कोण याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी