29 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeक्राईमनाशिकच्या महिलेस सोलापूरच्या सराफांकडून ७६ लाखांचा गंडा

नाशिकच्या महिलेस सोलापूरच्या सराफांकडून ७६ लाखांचा गंडा

भक्त परिवारातून ओळख झालेल्या सोलापूरच्या संशयितांनी नाशिकच्या महिलेस सोनारांच्या भिशीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल ७६ लाखांचा गंडा घातला आहे. त्याचप्रमाणे, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार आणि महिलेच्या नावावरील फ्लॅटच्या कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून कर्ज काढले. अशा रितीने संशयितांनी फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भक्त परिवारातून ओळख झालेल्या सोलापूरच्या संशयितांनी नाशिकच्या महिलेस सोनारांच्या भिशीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल ७६ लाखांचा गंडा (duped) घातला आहे. त्याचप्रमाणे, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार आणि महिलेच्या नावावरील फ्लॅटच्या कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून कर्ज काढले. अशा रितीने संशयितांनी फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Nashik woman duped of Rs 76 lakh by Solapur jewellers)

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत रवींद्र पोतदार (रा. अंदूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), रेणुका रवींद्र पोतदार, रवींद्र पोतदार अशी संशयितांची नावे आहेत. रुपाली धीरज पंडित (रा. आकांक्षा पार्क, पवार लॉन्स, पेठ रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गाणगापूर येथील श्री दत्त संप्रदायाच्या भक्त आहेत. २०१७ मध्ये त्यांची ओळख या भक्त परिवारातील संशयित प्रशांत पोतदार यांच्याशी झाली होती. एकाच भक्त परिवारातील असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. त्याच ओळखीतून संशयितांनी रुपाली यांना सोलापूरमध्ये त्यांच्या सोनारांची भिशीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यातून चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो असेही आमिष दाखविले. त्यामुळे रुपाली यांनी आर्थिक गुंतवणूक केली. परंतु संशयितांनी ठरल्यप्रमाणे, त्यांना कोणताही मोबदला दिला नाही व भिशीची रक्कमही दिली नाही.

तसेच, पोतदार यांच्यावर विश्वास ठेवून रुपाली यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने शुद्ध करण्यासाठी दिले. परंतु, संशयितांनी ते दागिनेही परत न करता त्या दागिन्यांचे अपहार केला. त्याचप्रमाणे, रुपाली यांच्या नाशिकमधील फ्लॅटवरील कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी करून त्यावर कर्ज काढले. ही रक्कम वापरून घेत ती परत न करता फसवणूक केली. अशा तिन्ही प्रकारात संशयिताने त्यांची ७६ हजार ४७ लाख ६२० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरुळचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी