29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeक्राईमoreo Vs fabio: बिस्कीटांच्या युद्धात 'पार्ले' बुडाले! दिल्ली हायकोर्टाचा 'ओरियो'ला दिलासा..

oreo Vs fabio: बिस्कीटांच्या युद्धात ‘पार्ले’ बुडाले! दिल्ली हायकोर्टाचा ‘ओरियो’ला दिलासा..

पार्ले ही बिस्कीट व्यवसायातील देशातली अग्रगण्य कंपनी आहे. दुसऱ्या महायुद्धात भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांचे ते आवडते बिस्किट होते. पार्लेने पिढ्यानपिढ्या देशाचे आणि कंपनीचे नाव लौकिक करण्यात यश मिळवले आहे. मात्र भारतीयांच्या हृदयात स्थान करून बसलेल्या पार्ले जीविरुद्ध बिस्किटांच्या डिझाइनशी संबंधित एका नामांकित अमेरिकन कंपनीतर्फे कारवाई करण्यात आली. पार्लेजीने ओरियोच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी मार्च 2021 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. आज न्यायालयाने ओरियोच्या बाजूने निकाल देऊन दिलासा दिल्यामुळे बिस्किटयांच्या युद्धतही पार्ले (कंपनी) गळून पडल्याचे चित्र आहे. (Oreo vs Fabio: Delhi High Court no consolation to Parle)

ओरिओ बिस्किटसारखी समान दिसणारी पार्ले कंपनीचे बिस्किट फॅबिओवर डिझाईन कॉपीराईटची कारवाई करण्यात आली आहे. ओरिओ बनवणारी प्रसिद्ध कंपनी मॉण्डेलीझ इंटरनॅशनलने पार्लेविरोधात हा दावा ठोकला आहे. गेल्यावर्षी दिल्ली उच्च न्यायालयात ही कारवाई करण्यात आली होती. भारतात बिस्किटांच्या डिझाईनच्या कॉपीबाबत पूर्वीपासून विविध कंपन्यांची बरीच प्रकरणं कोर्टात गेलेली आहेत.

ओरियोनं दावा केला आहे, की पार्ले फॅबियो बिस्किटाचं डिझाईन तंतोतंत त्यांच्या ओरियोसारखं आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने 12 एप्रिलला सुनावणी केली होती. याविषयी अमेरिकेच्या मॉण्डेलीज इंटरनॅशनलचं युनिट असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल ग्रेट ब्रँड्सनं ट्रेडमार्कचं उल्लंघन झाल्याचे प्रकरण दाखल केले होते.पार्लेने ओरियोसारखे दिसणारे पॅकेजिंग वापरले आहे. ज्यात निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे आवरण वापरुन त्यावर व्हॅनिला क्रीम चॉकलेट बिस्किटे दर्शनीय आहेत, जी सरळसरळ ओरियोच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन करते.

oreo-vs-fabio-delhi-high-court-no-consolation-to-parleहायकोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, पार्लेने प्रथमदर्शनी ओरियो या नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन केले आहे आणि तसेच बिस्किटयांच्या पॅकेजिंगनुसार फसव्या रीतीने हा दृश्य धारण करण्यात आला आहे. मूळ बिस्किटाचे रूपांतर असलेला पार्लेच्या फॅबियो (FAB!O) बिस्किटाचे नाव आणि बाहेरील आवरण हे ग्राहकांना संभ्रमात पाडू शकते.

कोर्टाने ओरियोला अंतरिम संरक्षण देताना म्हटले की, दोन्ही उत्पादनात “ई-यो”चा उच्चार समान असल्याने ही नावे देखील निःसंशयपणे सारखी वाटत आहेत. पार्लेने आपल्या जाहिरातींमध्ये Fab!o ला fa-bee-yo म्हणून उच्चारले जाणे आवश्यक आहे, ती ग्राहकांसाठी एक प्रामाणिक पोचपावती असेल. न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे आदेश जारी केले आहेत.

ओरियो ही माँडेलीझ तीच प्रसिद्ध कंपनी आहे, ज्यांनी कॅडबरीचा ब्रँडही विकत घेतला आहे. मॉण्डेलीझनं भारतात जवळपास 10 वर्षांपूर्वी ओरिओ लाँच केलं होतं. पार्लेने 2021 रोजी जानेवारीत फॅबिओ हा प्रॉडक्ट लॉन्च केला होता. ओरियोनं आतापर्यंत या ब्रँडच्या सर्व प्रकारांना लॉन्च केलं आहे. यात चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला ऑरेंज, क्रीम आणि स्ट्रॉबेरी आहेत. (Parle Vs Cadbury)

हे सुद्धा वाचा :

पीनट बटरमुळे मधुमेहाचा धोका टळतो ?, जाणून घ्या

अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल!

बलात्काराचा खोटा गुन्हा, सीएने केली आत्महत्या

पार्लेची प्रीमियम सेगमेंटमध्ये एंट्री

खरं पाहिल्यास देशात पारले जी एकदम स्वस्त आणि ग्लुकोज बिस्किटांसाठी ओळखला जातो. ग्रामीण भागात याला मोठी मागणी आहे. मात्र मागच्या 10-15 वर्षात शहरी भागात पारलेचा प्रीमियम बिस्किटांशी संघर्ष होतो आहे. विशेषतः ब्रिटानिया, मॉण्डेलीझ, आयटीसी अशा कंपन्यांनी शहरी भागात प्रीमियम बिस्किटांवर फोकस केला आहे. हेच कारण आहे, की पारलेनंसुद्धा या प्रीमियममध्ये आपली स्थिती बळकट बनवण्यासाठी अशा महाग बिस्किटांच्या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी