30 C
Mumbai
Sunday, May 7, 2023
घरक्राईममुंबईत पुन्हा २६/११ घडविण्यासाठी पाकिस्तानचा हस्तक सरफराज मेमन भारतात दाखल

मुंबईत पुन्हा २६/११ घडविण्यासाठी पाकिस्तानचा हस्तक सरफराज मेमन भारतात दाखल

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानचा क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी दहशतवादाचा नंगानाच घातला होता. या हल्ल्यात कित्येक निरपराध मुंबईकरांचा बळी गेला होता. (a series of terrorist attacks that took place in November 2008) मुंबईत पुन्हा एकदा २६/११ सारखाच भयंकर घातपात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला असून त्यासाठी पाकिस्तानी हस्तक सरफराज मेमन भारतात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. ‘एनआयए’कडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ई-मेल पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Pakistani master Sarfraz Memon entered India to recreate 26/11 in Mumbai)

पाकिस्तान, चीन, हॉंगकॉंग येथून दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत घुसल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई पोलिसांना दिली आहे. सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहोचल्याचे ई-मेलमध्ये म्हंटले आहे. ‘एनआयए’ या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ई-मेल आल्याची सूत्रांनी माहिती दिली. पाकिस्तानी हस्तक सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचे त्यात म्हटले आहे.

याबाबत मध्यप्रदेश पोलिसांना कळवण्यात आले आहे. सरफराज भारतासाठी धोकादायक असून त्याची ओळख पटण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांकडून त्याची माहिती मागविण्यात आली आहे. त्याचा चालक परवाना, पारपत्र (पासपोर्ट), आधारकार्डची प्रत ‘एनआयए’कडून पोलिसांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. सर्व तपास यंत्रणा सरफराजचा कसून शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे, रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

फेसबुक लाईव्ह सुरु असताना ३५ लाख खर्च झाले, त्याची माहिती घेतली का; शिंदेंचा अजित पवारांना टोला

अधिवेशनात उपस्थित राहा, एकनाथ शिंदेंनी उद्धव गटातील आमदारांना बजावला व्हिप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी