28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्राईमSachi Vaze : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीनावर शुक्रवारी फैसला

Sachi Vaze : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीनावर शुक्रवारी फैसला

मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी तुरूंगात आहे. त्याने जामीन मिळावा यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणीचा निकाल विशेष पीएमएलए न्यायालयाने राखून ठेवला असून येत्या शुक्रवारी त्यावर निकाल देण्यात येणार आहे.

मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे सध्या आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी तुरूंगात आहे. त्याने जामीन मिळावा यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणीचा निकाल विशेष पीएमएलए न्यायालयाने राखून ठेवला असून येत्या शुक्रवारी त्यावर निकाल देण्यात येणार आहे.
ईडीने सचिन वाझेला आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार अशा दोन प्रकरणांमध्ये अटक केली आहे.

सध्या अटकेत असल्याल्या सचिन वाझे याने सीआरपीसी कलम ८८ अंतर्गत त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज (दि. 15) न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सचिन वाझे याला जामीन दिल्यास तो तपासात पुर्ण सहकार्य करेल. तो या प्रकरणाशी संबधीत पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, अशी हमी सचिन वाझे याच्या तर्फे त्याच्या वकिलाने केली. तर सचिन वाझे याला जामीन देण्यात येऊ नये यासाठी ईडिकडून युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीवेळी न्यायालयाने दोन्ही बाजू एकुन घेतल्या, ही सुनावणी पारपडल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून शुक्रवारी (दि.18) रोजी न्यायालय यावर निकाल देणार आहे.

कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य काही लोकांना आरोपी करण्यात आले आहे. अनिल देशमुख हे सध्या अटकेत आहेत. या प्रकरणात सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार करण्यात आले असून, वाझे याने आपल्याकडे असलेली माहिती देण्यास तयार आहोत अशी सहमती दिली आहे.
हे सुद्धा वाचा :

Ajit Pawar : अब्दुल सत्तारांना विनाश काले विपरीत बुध्दी; अजित पवारांनी थेट घेतला खरपूस समाचार

Bharat Jodo Yatra : तिरंगा श्रीनगरमध्ये नेऊन फडकवणार, कोणीही अडवू शकत नाही : राहुल गांधी

NCP Protest in Mantralay : अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मंत्रालयावर मोर्चा

एनआयएने देखील केली होती अटक
सचिन वाझे, सनिल माने आणि रियाझ काझी यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेले वाहन आणि धमकीचे पत्र ठेवल्याप्रकरणी तसेच मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी अटक केली होती. तर अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सचिन वाझेला ताब्यात घेतले होते. सचिन वाझे याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यानुसार बार आणि हॉटेल्स मालकांकडून पैसे वसूली केल्याचे जबाबात सांगितले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी