31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्राईमपुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन...

पुणे हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक

पुणे कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागल्याचं हळू-हळू उघड होत चाललंय. याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली. अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. परंतु, या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार केल्याचा प्रकार समोर आला.

पुणे कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागल्याचं हळू-हळू उघड होत चाललंय. याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार (blood reports of accused) केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली. अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. परंतु, या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार (blood reports of accused) केल्याचा प्रकार समोर आला.(Pune hit-and-run case: Two doctors of Sassoon Hospital arrested for tampering with blood reports of accused)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलंय. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाईल. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आज 27 मे पत्रकार परिषदेत कारवाईची सविस्तर माहिती देणार आहेत.

त्यामुळं केली दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट : अपघात झाल्यानंतर येरवाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीनं त्याची ब्लड टेस्ट करणं गरजेचं होतं. परंतु, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी मुलाला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणात धनिकपुत्राला मदत झाल्याच्या संशयानं पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली. तसंच हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडं पाठवण्यात आले. दोन्ही रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचे आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी