29 C
Mumbai
Monday, August 7, 2023
घरक्राईमभरबाजारात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

भरबाजारात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाबमध्ये महिलेची कुऱ्हाडीचे घाव घालून भर बाजारात हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीनेच हे कृत्य केले, त्यानंतर पतीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मृत महिला आणि हल्लेखोर पती यांच्यात घटस्फोटाची केस सुरु होती अशी माहिती देखील समोर येत आहे. पंजाबमधील संगरुरमधील सुमन मार्केट परिसरात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पतीने आपल्या पत्नीला बाजारपेठेत पाहिले, त्यानंतर संतापलेल्या पतीने भरबाजारातच पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने देखील विषारी औषध प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपी पतीला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थीर त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे, व्हिडीओमध्ये आरोपी भर बाजारात हातात कुऱ्हाड घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. पत्नीवर हल्ला करत असतना बाजारपेठेत लोकांची गर्दी होती. अचानक घडलेले हे दृष्य पाहून लोकांमध्ये खळबळ उडाली. काही लोकांनी आरोपीवर विटा फेकुन मारल्याचे देखील दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांचे संसदेत आगमन; विरोधकांमध्ये संचारला उत्साह

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात १०० कोटी रुपयांची मदत

भाजपाने थाळ्या वाजवून देशात दारिद्र्य आणले- नाना पटोले यांची सरकारवर टीका

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करणारा व्यक्ती हातात शस्त्र घेऊन बाजारात उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आरोपींच्या आजूबाजूला गर्दी दिसत आहे. लोक विटा फेकून मारत असताना रागावलेला हल्लेखोर पती लोकांना देखील धमकावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी