31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरक्राईमसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुसेसावळीत जाळपोळ, दंगल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुसेसावळीत जाळपोळ, दंगल

सोशल मीडियावरील एका आक्षेपर्ह पोस्टमुळे पुसेसावळी (ता. खटाव, जि. सातारा) येथे दोन गटात रविवारी रात्री जोरदार चकमक झाली. थोड्याच वेळात या भांडणाला दंगलीचे स्वरुप प्राप्त होत, गावातील काही दुकानांचे, धार्मिक स्थळाचे देखील नुकसान झाले. या दंगलीत काही तरुण जखमी झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांचा याबाबत माहिती मिळताच सातारा, सांगली, कोल्हापुरातून मोठा फौजफाटा गोवात पोहचला.

गावातील परस्थिती चिघळू नये तसेच आजूबाजू्च्या परिसरात या घटनेचे पडसाद उमटू नयेत सासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जि्ल्हाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले असून, खबरदारीचा उपाय म्हणून गावातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साधारण 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही दंगल झाली. महापुरुषांबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर गावात तरुणांचा जमाव झाला आणि बाजारपेठेत दुकानांचे नुकसान, जाळपोळीस सुरुवात झाली. दोन गटात सुरु झालेल्या या मारामारीत काही तरुण जखमी झाले. एका तरुणाला जबर मारहाण झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

जमावाने घरे, दुकानांना आग लावली. तसेच बाजारपेठेतील फळभाज्यांच्या दुकानांतील फळे, भाज्यांचे नुकसान केले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 100 अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून ज्या पोस्टमुळे दंगल उसळली ती पोस्ट देखील समाज माध्यमातून हटविली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी ट्विटरुन शांततेचे आवाहन केले असून शासन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, ”सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी ता: खटाव येथील घटना दुःखद आहे. माझे जनतेला आवाहन आहे की कृपया कोणत्याही अफवेला बळी पडू नका. समाजात सौहार्द आणि शांतता राखण्यासाठी आपण शासन- प्रशासन तसेच पोलीस खात्याला सहकार्य करावे.”

तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे की, ”खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. माझे नागरीकांना जाहिर आवाहन आहे की कृपया कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता आणि संयम राखण्यासाठी शासन व प्रशासनाला सहकार्य करावे. माझे परिस्थितीवर लक्ष असून मी प्रशासनाच्या संपर्कात आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी