33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमखरंच.... कोरोना लस घेतल्यास 5000 रुपये मिळणार?

खरंच…. कोरोना लस घेतल्यास 5000 रुपये मिळणार?

टीम लय भारी

दिल्ली : सध्या लसीकरणासंदर्भातील एक मेसेज चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मेसेजमध्ये चक्क असे सांगण्यात आले  आहे की ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांना पंतप्रधान लोककल्याण विभागाकडून 5000 रुपये देण्यात येत आहेत. या मेसेजमुळे अनेकांचा गोंधळ उडाला असून काही जणांनी 5000 रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्दा केल्याचे समोर आले आहे. परंतु सदर मेसेज खोटा असून लुटमार करण्याच्या हेतूने काही समाजकंठकांकडून अशी अफवा पसरवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

लसीकरणाबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, “एक महत्त्वाची माहिती – ज्यांना लस मिळाली आहे, त्यांना पंतप्रधानांच्या लोककल्याण विभागाकडून 5000 रुपये दिले जात आहेत, जर तुम्हालाही करोनाची लस मिळाली असेल, तर आताच फॉर्म भरा आणि 5000 रुपये मिळवा. https://pm-yojna.in/5000rs या लिंकवरून फॉर्म भरा. कृपया लक्षात ठेवा – 5000 रुपये फक्त 30 ऑगस्ट 2022 पर्यंत उपलब्ध असतील!” अशा प्रकारचा संदेश सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान याबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करून असा कोणत्याच प्रकारचा मेसेच सरकारकडून देण्यात आलेला नाही असे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावरील हा मेसेज नीट पाहिल्यास त्यामध्ये अनेक चूका असल्याच्या लक्षात येतील त्यामुळे ही माहिती संपुर्णपणे खोटी आहे. या मेसेजसाठी दिलेली लिंक सुद्धा अधिकृत नाही कारण कोणत्याही सरकारी लिंकमध्ये Gov चा उल्लेख नक्कीच असतो. या लिंकमध्ये फसवणूक करणाऱ्यांनी अत्यंत हुशारीने PM आणि Yojna  हे शब्द वापरून नागरिकांना लगेचच भुरळ पाडेल अशीच प्रस्तावना लिहिली आहे, जेणेकरून लोक सहजच जाळ्यात ओढली जातील.

जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला या वेबसाईटवर तुमचे नाव, कोणती लस घेतली, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि मोबाईल नंबर याबाबत माहिती विचारली जाते. त्यामुळे या अशा गोष्टींना कोणीच फसू नका कारण नंबर दिल्यास त्या लोकांचा दिलेल्या नंबरवर फोन येतो, यावेळी आमिष दाखवले जाते आणि 5000 रुपये मिळवून देण्याच्या बहाण्याने काही रक्कम उकळण्यात येते त्यामुळे असा कोणत्याही प्रकारचा मेसेच आला असल्याच कोणताच प्रतिसाद देऊ नका असे सध्या सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

आजपासून मुख्यमंत्री शिंदेंचा महाराष्ट्र दौरा, पूरग्रस्तांना मिळणार दिलासा?

मुख्यमंत्री ‘महाराष्ट्रा’चे; कामाचा धडाका मात्र ‘ठाण्यात’ !

VIDEO : ईडीच्या दहशतीवरून काॅंग्रेस भडकली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी