30 C
Mumbai
Monday, May 8, 2023
घरक्राईमसदानंद कदम यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

सदानंद कदम यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणात शुक्रवारी संध्याकाळी सक्तवसुली संचलनालयाने (ED) सदानंद कदम यांना अटक केली होती. शनिवारी (दि.11) रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ईडीचा युक्तीवाद मान्य करत सदानंद कदम यांना पाच दिवसांची म्हणजेच 15 मार्च पर्यंत कोठडी दिली आहे. (Sadanand Kadam ED custody for 5 days)

ईडीच्यावतीने अँड. सुनील गोन्सालवीस यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी 11 मे 2022 रोजी ECIR दाखल झाल्याचा दाखला दिला. कदम यांना अटक करण्यासाठी ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या अटकेची आवश्यकता नव्हती. PMLA ची केस ही ECIR वरच आधारीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एफआरआय, खासगी तक्रार, सरकारी तक्रार नसेल तर ECIR रजिस्टर होणार नाही. पण त्यांच्यावर दाखल FIR वर ECIR दाखल झाला आहे. त्यानंतर चौकशी, साक्ष, पुराव्यांची तपासणी केल्यानंतर कदम यांना अटक करण्याची आवश्यकता निश्चित केले जाते असे गोन्सालवीस यांनी सांगितले. कदम यांच्यावर भादवी 420 आणि पर्यावरण कायद्यानुसार FIR दाखल झाला आहे. फौजदारी आणि ECIR खटल्याची सुनावणी स्वतंत्र पद्धतीने होते. या सुनावण्या एकत्र होत नाहीत असे अॅड. गोन्सालवीस म्हणाले.

सदानंद कदम यांना 12 डिसेंबर 2022,28 फेब्रुवारी 2023 आणी 09 मार्च 2023 रोजी असे 3 वेळा चौकशीसाठी समन्स पाठवले. मात्र ते हजर झाले नाही. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणले. चौकशीनंतर 10 मार्चला रात्री 9 वाजता त्यांना अटक केले. कदम यांना अटक करण्यासाठी सबळ पुरावा असल्याने अटक केल्याचे अँड. गोन्सालवीस यांनी युक्तीवाद करताना सांगितले.

सुनील गोंसालवीस युक्तिवाद करताना म्हणाले, विनोद दापोलकर या एजंटच्या माध्यमातून विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी कोकणात भूखंड विकत घेतला. सदानंद कदम यांनी जमीन खरेदीसाठी अनिल परब यांना मदत केली. 1 कोटी 80 लाखाला हा व्यवहार निश्चित झाला. अनिल परब यांनी 1 कोटी रुपयांचा धनादेश विभास साठे यांना दिला आणि 80 लाख रोख सदानंद कदम मार्फत अनिल परब यांनी दिले. ही अनिल परब यांची अनअकाऊंटेड कॅश असून विभास साठे यांनी रोख रक्कम आल्याचं मान्य केले. मात्र सदानंद कदम यांनी हे अमान्य केले. मात्र ही अनअकाऊंटेड कॅश अनिल परब यांची असल्याचा युक्तीवाद देखील अँड. गोन्सालवीस यांनी केला.
 हे सुद्धा वाचा
समाजाप्रती जैन समाजाची लोककल्याणकारी भावना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार 

तालुक्यात 86 कोटी लाखाच्या निधीतून रस्त्यांचे मजबुतीकरण होणार; आमदार बाळासाहेब थोरातांच्या पाठपुराव्याला यश


घाटकोपर शाह दाम्पत्याचा मृत्यू गिझरमुळे नाही तर भांग प्यायल्याने!

अनिल परब यांनी 2 मे 2017 रोजी 1 कोटी ट्रान्सफर केले. या जमिनीवर आधी बंगलो होते. त्याला रिसॉर्ट वर कनव्हर्ट करण्यासाठी आर्किटेक्ट कुलकर्णी यांना भेटले. मात्र ही जागा CRZ मध्ये येते हे कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं होते. त्यावेळी ते आम्ही करून घेऊ असे परब यांनी कुलकर्णी यांना सांगितल्याचा युक्तीवाद अँड. गोन्सालवीस यांनी केला. मूळ FIR मध्ये नाव नाही मग ECIR का हा त्यांचा आरोप हास्यास्पद असल्याचे देखील अँड. गोन्सालवीस यांनी केला. या व्यवहारात अनिल परब यांच्यासोबत कदम हे मनी लॉंड्रीग मधील प्रथम लाभार्थी आहेत. अनिल परब यांच्याकडे रोख 80 लाख आले कुठून ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत अशा अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यासाठी सदानंद कदम यांची कस्टडी हवी असल्याचे अँड. गोन्सालवीस म्हणाले. कोर्टाने गोन्सालवीस यांचा युक्तीवाद मान्य करत सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी