एनसीबी मुंबई झोनल विभागाचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापे मारल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. सीबीआयने वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईलने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांच्याकडून 25 कोटींची खंडणी मागितली, त्यापैकी आठ कोटी रुपये त्यांना देणार असल्याचे प्रभाकर साईलने सांगितले होते. तसेच नवाब मलिक यांच्या जावयाचे देखली प्रकरण होते.
हे सुद्धा वाचा
श्वेता तिवारीचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले मुलीपेक्षा तूच सुंदर
तळेगाव दाभाडेमध्ये भर दूपारी गोळ्या घालून, कोयत्याने वार करुन सामाजिक कार्यकर्त्याची हत्या
धक्कादायक: नशा करणाऱ्या बॉडीबिल्डरने जन्मदात्यांवरच केले चाकूने वार
त्यानंतर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने वानखेडे यांची चौकशी केली. तसेच त्यांच्या बैहिशोबी मालमत्तेचा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला होता. याच प्रकरणात सीबीआयने वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांच्या २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.