28 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरक्राईमसमीर वानखेडे यांची सीबीआयकडून तीन तास चौकशी

समीर वानखेडे यांची सीबीआयकडून तीन तास चौकशी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडचणीत सापडलेले एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज सीबीआय चौकशीसाठी बिकेसी येथील सीबीआयच्या कार्यालयात हजेरी लावली. एनसीबीच्या चौकशी पथकाच्या अहवालानंतर समीर वानखेडे आणि इतर चार जणांवर 11 मे रोजी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

समीर वानखेडे यांनी मात्र हे आरोप नाकारत माझ्यावर सुडाच्या भावनेतून कारवाई केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात त्यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. मात्र चौकशीसाठी उपस्थित रहावे असे देखील सांगितले.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात सिद्धरमय्या सरकारचा शपथविधी : राहुल गांधी म्हणाले दोन तासांत आश्वासने पूर्ण करणार

PUBG लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात लवकरच पुन्हा गेम सुरु होणार

मोठी बातमी ! 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद होणार

त्यानंतर आज समीर वानखेडे यांना सीबीआयने दुसरे समन्स बजावल्यानंतर सीबीआयच्या बीकेसी येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. सीबीआयने त्यांची ३ तास चौकशी केली. त्यानंतर ते कार्यालयातून बाहेर आले. वानखेडे यांची आठ सीबीआय अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. अधिकाऱ्यांनी वानखेडे यांना अनेक प्रश्न विचारले, आर्यन खान प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. तसेच सीबीआयने त्यांच्याकडे काही कागदपत्रे मागविली होती. ती देखील वानखेडे यांनी अधिकाऱ्यांसमोर सादर केली आहेत.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी