30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमशिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही - भाजपा

शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही – भाजपा

होर्डिंग्जवरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाल्याने शिंदे सेनेविरोधात भाजप आक्रमक •∆• भाजप आमदार निरंजन डावखरे, संजय केळकरांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या •∆• मुख्यमंत्र्यांचे खास विकास रेपाळे, नम्रता भोसले यांच्यासह 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

शिंदे सेना आणि भाजपात वर्षाच्या शेवटच्या दिवशीच जोरदार धुमश्चक्री सुरू झाली आहे. (Shinde Sena BJP Fighting) ठाण्यात शिंदे सेनेची दादागिरी आजिबात चालणार नाही असा इशारा भाजपाने दिला आहे. होर्डिंग्जवरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाल्याने शिंदे सेनेविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. याबाबत पोलिस गुन्हा नोंदवून घेत नसल्याने भाजप आमदार निरंजन डावखरे, संजय केळकरांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी वागळे इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. भाजपाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेवटी पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे खास विकास रेपाळे, नम्रता भोसले यांच्यासह 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेणे भाग पाडले.

वागळे इस्टेट परिसरातील परबवाडी भागात शुक्रवारी ठाणे भाजप पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव आणि शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यात हमरीतुमरी झाली होती. तेव्हा पोलिसांनी दोन्ही बाजूंना ताकीद देत समेट घडवून आणला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत खास असलेले माजी नगरसेवक नम्रता भोसले आणि विकास रेपाळे यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप ठाणे भाजपने केला. दरम्यान, शिंदे सेनेने केलेल्या मारहाणीत भाजपा पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी सकाळी जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. जाधव सध्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

हे सुध्दा वाचा : 

शिंदेंच्या सरनाईकाचा प्रताप उघडकीस; 11 कोटींच्या संपत्तीवर येणार जप्ती

संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

उद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद

शिंदे सेनेने केलेल्या या हल्ल्यामुळे ठाण्यातील भाजप कार्यकर्ते भडकले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील विकास रेपाळे व नम्रता भोसले यांच्याविरोधात ठाणे भाजपने ट्विटही केले. या मारहाण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात प्रशांत जाधव यांच्यावरील हल्लेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून या हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी भाजपने केली. पोलीस प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले. शनिवारी भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे व भाजप पदाधिकाऱ्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तर जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर पोलीस ठाण्यातच बसून राहण्याच्या इशारा दिला. सीसीटीव्हीमध्ये मारहाण करणाऱ्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने शेवटी याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. त्यात मुख्य संशयित विकास रेपाळे, नम्रता भोसले यांच्यासह 10 जण आरोपी आहेत. मात्र, हा गुन्हा दाखल होताच ठाणे पोलिसांनी प्रशांत जाधव यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. शनिवारी रात्री उशीरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती. ठाण्यातील या प्रकारामुळे राज्यातील भाजप आणि शिंदे सेनेतील कार्यकर्त्यांमधील जानी दुश्मनी चव्हाट्यावर आली आहे.

Shinde Sena BJP Fighting, FIR against Eknath Shindes Keen Members, Shinde Sena Dadagiri

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी