26 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरक्राईममैत्रिणीला मिठीत घेतले, मग गोळ्या झाडून केली हत्या; स्वत:ही केली आत्महत्या

मैत्रिणीला मिठीत घेतले, मग गोळ्या झाडून केली हत्या; स्वत:ही केली आत्महत्या

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील शिव नाडर विद्यापीठात धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठात बीएच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तीच्या सोबत शिकणाऱ्या तरुणाने देखील स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. या घटनेतील मृत तरुणाचे नाव अनुज सिंग असे असून मृत तरुणीचे नाव नेहा असल्याचे समोर आले आहेत. अनुज काही काळ नेहाशी बोलला त्यानंतर त्याने तीला मिठी मारली आणि त्यानंतर पिस्तूलातून तिच्यावर गोळ्या झाडून तीची हत्या केली. नेहाची हत्या केल्यानंतर त्याने त्याच पिस्तूलाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

समोर आलेल्या माहितीनुसार अनुजचा जागेवरच मृत्यू झाला. तर नेहाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनुज अमरोहा येथील रहिवासी होता. तर नेहा कानपूरची रहिवासी होती. अनुज आणि नेहामध्ये प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
ते दोघेही बीएच्या समाजशास्त्र विषयात पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. विद्यापीठातील डायनिंग हॉलच्या समोर अनुज नेहाला भेटला, तेथे ते एकमेकांसोबत थोडावेळ बोलले, अनूजने नेहाला मिठीत घेतले आणि पिस्तूल काढून नेहावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अनुज तातडीने होस्टेलच्या रुममध्ये गेला आणि तेथे त्याने पिस्तूलातून स्वत:वर गोळ्या झा़डून आत्महत्या केली.

हे सुद्धा वाचा

…म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचे कोटी कोटी आभार

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या शपथ घेणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती

आता बैलगाडा शर्यतींचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

हे दोघेजण ही 21 वर्षांचे होते. ते दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते, मात्र या घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनुज हा बीएच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. गुरुवारी दुपारी नेहा आणि अनुज डायनिंग हॉलच्या बाहेर एकमेकांना भेटले, त्यानंतर ते एकमेकांना मिठी मारताना देखील दिसले. त्यानंतर त्याने नेहावर गोळ्या झाडल्या आणि तातडीने होस्टेलच्या रुमवर येऊन स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. नेहाला खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केल्याचे पोलिसांनी सांगितले. अनुज आणि नेहा चांगले मीत्र होते, मात्र त्यांच्यात काही दिवसांपासून वाद असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर दोघांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी