25 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरक्राईमShraddha Murder Case : 'जे झालं ते चुकून झालं!' श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी...

Shraddha Murder Case : ‘जे झालं ते चुकून झालं!’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला मंगळवारी (22 नोव्हेंबर) साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यादरम्यान आफताबने न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला आणि आपण जे काही केले ते चुकून झाल्याचे सांगितले.

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला मंगळवारी (22 नोव्हेंबर) साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यादरम्यान आफताबने न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला आणि आपण जे काही केले ते चुकून झाल्याचे सांगितले. रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केली. आता तपासात पोलिसांना पूर्ण मदत करत असल्याचेही त्यानी सांगितले. आफताब म्हणाला, “श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले होते हे मी पोलिसांना सांगितले आहे. आता इतका वेळ निघून गेला आहे की मी बरेच काही विसरलो आहे”. तो म्हणाले की, जे काही घडले ते चुकून झाले. रागाच्या भरात झाले. त्यानी सर्व प्रश्नांची उत्तरे इंग्रजीतच दिली. पोलिसांच्या चौकशीत तो इंग्रजीतच प्रश्नांची उत्तरे देतो.

न्यायालयाने चार दिवसांची कोठडी वाढवली
दिल्ली पोलिसांच्या मागणीवरून साकेत न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आफताबने ज्या जंगलात मृतदेहाचे तुकडे फेकले होते, त्या जंगलात पोलीस आता पुन्हा एकदा शोधमोहीम राबवणार आहेत. पोलिस सूत्रांवर विश्वास ठेवला तर आफताब सातत्याने तपास वळविण्याचा प्रयत्न करत आहे. तो सतत आपली विधाने बदलत असतो. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे, शस्त्रे आणि श्रध्दाच्या मोबाईलबाबत त्याने अनेकदा आपली विधाने बदलली आहेत.

हे सुद्धा वाचा

Kokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव’

इंडोनेशिया भुकंपाने हादरले; 46 जणांचा मृत्यू

Shah Rukh Khan: किंग खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार सन्मानित

आफताबने मृतदेहाचे 35 तुकडे केले होते
श्रद्धाच्या हत्येच्या आरोपाखाली आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आफताबने मे महिन्यात ही हत्या केली होती. हत्येनंतर त्याने निर्दयीपणे मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दररोज एक एक करून फेकून दिले. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा श्रद्धाच्या मैत्रिणीने चुकीच्या खेळाची भीती व्यक्त केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून हत्येचा छडा लावला.

दरम्यान, या प्रकरणातील तपास अजूनही सुरू असून रोज नवनविन खुलासे होत आहेत. शिवाय प्रत्येक दिवशी श्रद्धा हत्याकांडाबाबतची धक्कादायक माहिती उघड होत आहे. त्यामुळे याप्रकरणातील गुढ अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. शिवाय श्रद्धावर झालेल्या अत्याचार आणि तिची निघृण हत्या याबाबत संपूर्ण देशातून निषेध देखील व्यक्त केला जात आहे आणि आफताबला लवकर आणि कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!