25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरक्राईमपोलिसांच्या असहकार्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला; श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद

पोलिसांच्या असहकार्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला; श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद

श्रद्धा वालकर हिचे वडिल विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील दुःख समाजासमोर मांडले. यावेळी श्रद्धाला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी विकास वालकर यांनी केली असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय ही पत्रकार परिषद घेत असताना विकास वालकर काही अंशी भावुक झाले असल्याचेही दिसून आले.

गेल्या महिनाभरापासून राज्यासह संपूर्ण देशात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण चांगलेच धुमाकूळ घालत आहे. या प्रकरणार अनेक नवनविन खुलासे झाले आहेत. ज्यामुळे या प्रकरणातील गुढ आणखी वाढले असून काही खुलासे संतापजनक असल्याचे दिसून येते. अशांतच आता या प्रकरणाबाबत श्रद्धा वालकर हिचे वडिल विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील दुःख समाजासमोर मांडले. यावेळी श्रद्धाला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी विकास वालकर यांनी केली असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय ही पत्रकार परिषद घेत असताना विकास वालकर काही अंशी भावुक झाले असल्याचेही दिसून आले.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये विकास वालकर म्हणाले की, श्रद्धाची हत्या झाल्यामुळे आम्हाला मोठं दु:ख झालं आहे. यावेळी दिल्ली गव्हर्नर यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस आणि वसई पोलीसांचे काम एकत्रितपणे चालले आहे. मात्र अगदी सुरूवातीच्या काळात वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर पोलिसांनी वेळीच सहकार्य केले असते तर, आज माझी मुलगी जिवंत असती, किंवा काही पुरावे मिळायला मदत झाली असती असे विकास वालकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार; दीपक केसरकरांची माहिती

एअर इंडियाचा होणार कायापालट; खर्च होणार तब्बल 3300 कोटी

बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात होणार मोठे बदल

आज मी माझी मुलगी श्रद्धा वालकर हिच्या मृत्यू बद्दल बोलणार आहे. दिल्ली गव्हर्नर यांनी मला आश्वासन दिले आहे की मला न्याय मिळवून देणार. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील मी भेट घेतली आहे. किरीट सोमय्या हे माझ्या घरी आले होते, तसेच निलम गोऱ्हे यांचेही आभार, असेही विकास वालकर यावेळी म्हणाले.

आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, सोबतच आफताबच्या कुटूंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी व त्यांना सुद्धा शिक्षा द्यावी. या कटात जे कोणी सामील असतील त्याचा तपास करून त्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देखील श्रद्धाच्या वडिलांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, अशाप्रकारे भविष्यात कोणत्याही मुलीवर अन्याय व्हायला नको यासाठी शासनाने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाय आफताबला झालेल्या शिक्षेमार्फत श्रद्धाला न्याय मिळेलच त्यासोबंतच पुढील काळात कोणत्याही नराधमाची असले कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असाही सूर विकास वालकर यांच्या बोलण्यातून यावेळी उमटला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!