29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्राईमडीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

डीजेच्या तीव्र आवाजामुळे कोमात गेलेल्या वयस्कर शिक्षकाचा मृत्यू

आवाज वाढव डीजे बोंबलून, डीजेच्या आईची शपथ घेणाऱ्या आणि डीजेच्या तालावर डोलणाऱ्यांची संख्या कमी नाही. तथापि, आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशीकाही प्रकरणे आहेत, ज्यात डीजेचा तीव्र आवाज अनेक लोकांचे जीवन उध्वस्त करू शकतो. डीजेच्या आवाजाने तरुणाच्या कानाचा पडदा फाटल्याची घटना ताजी असतानाच आता डीजेच्या आवाजामुळे एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागल्याचे समजते. अहमदनगरच्या श्रीगोंदा येथील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेल्या शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिक्षक अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कर्जत येथे गेले होते. मात्र तेथेच त्यांच्यावर काळाचा घाला झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी  लावण्यात आलेल्या डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिक्षक अशोक बाबुराव खंडागळे (वय 58) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कर्जतच्या कौडाणे गावात गेले होते. मात्र जयंतीनिमित्त सुरू असणाऱ्या डीजेच्या तीव्र आवाजाने त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते कोमात गेल्याची खबर डॉक्टरांनी दिल्याने त्यांच्या परिवारासोबतच शाळेतले सहकारी देखील चिंतातूर झाले होते. महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज सुरू होती. शनिवारी (दि. 6) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे, शिक्षक नेते गजानन ढवळे, अशोक आळेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अशोक खंडागळे यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यानिमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता. मात्र सदर घटनेत तक्रारपत्र/आरोपपत्र कोणावरही दाखल झालेले नाही, यामुळे समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : 

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: DRDO प्रदीप कुरुलकरांची RAW कडून चौकशी!

WWE स्टार सारा लीच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा

अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार प्रकरणी वृध्दाला 10 वर्ष शिक्षा

Shrigonda teacher dies after falling into coma due to DJ loud music

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी