27 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeक्राईमकोचिंग क्लासच्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोट न सापडल्याने गुढ वाढले

कोचिंग क्लासच्या तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोट न सापडल्याने गुढ वाढले

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील दोन विद्यार्थी एकाच होस्टेलमध्ये राहत असल्याची माहिती देखील समोर आली असून पोलीस अधीक्षक केशर सिंह शेखावत यांनी सांगितले की, मृत विद्यार्थ्यांमध्ये दोघेजण बिहारचे आहेत. हे दोघे येथील प्रसिध्द कोचिंग क्सालमध्ये शिकत होते. दोन्ही विद्यार्थ्यांनी सोमवारी त्यांच्या रुममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यापैंकी एकजण 19 वर्षांचा तर दुसरा विद्यार्थी 18 वर्षांचा आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी 11 वी मध्ये शिकत होते. गेले सहा महीने ते पेईंग गेस्ट हाऊसमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते. मात्र ते मित्र होते किंवा नव्हते याची माहिती अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर घटनेबाबत पेईंग गेस्ट हाऊसच्या मालकाने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही मुले सकाळी घराबाहेर न पडल्याने घर मालकाला संशय आला. त्यानंतर घरमालकाने अनेकदा त्यांच्या रुमचा दरवाजा वाजवून त्यांना आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याने रुमचे दरवाजे तोडले. त्यावेळी त्याला दोघे ही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसू आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. तसेच मृत मुलांच्या मोबाईल फोन्सची तपासणी सुरू असल्याचे देखील ते म्हणाले. हे दोघे ही विद्यार्थी कोटा येथे गेल्या तीन वर्षांपासून राहत होते.

 हे सुद्धा वाचा

कोरोनानंतर प्रथमच घडला विक्रम; एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांचा मुंबई विमानतळावरुन प्रवास

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

सर्वसामान्यांना दिलासा; महागाईचा आलेख खालावला
तर दुसऱ्या एका घटनेमध्ये एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने विषारी पदार्थ खावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा विद्यार्थी मध्यप्रदेशच्या शिवपूरी येथील रहिवासी होता. पोलिसांनी सांगितले की, हा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी नीट परीक्षेचा अभ्यास करत होता. तो विद्यार्थी गेली दोन वर्षे कोटा येथे राहत होता. पोलिसांनी सांगितले की, एक विद्यार्थी रविवारी रात्री गॅलरीत बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे एका विद्यार्थ्याला दिसले. त्याने तात्काळ होस्टेलच्या मालकाला याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात भरती केले, मात्र काहीवेळानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी