26 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरक्राईमदहशतवादांच्या निशाण्यावर RSS कार्यालय?

दहशतवादांच्या निशाण्यावर RSS कार्यालय?

टीम लय भारी 

केरळ : दहशतवादी कारवायांना पुन्हा ऊत आला असून यावेळी त्यांनी केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला लक्ष केले आहे. आरएसएसच्या कार्यालयात बाॅम्ब हल्ला झाला असून यामध्ये ऑफिस इमारतीच्या काचा फुटल्या आहेत, तर यात सुदैवाने कोणतीच जीवीतहानी झालेली नाही.

केरशमधील कुन्नूर जिल्ह्यातील पय्यन्नूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे. या ऑफिस शेजारीच पोलिस स्टेशन आहे तरीसुद्धा संघाच्या कार्यालयात आज बाॅम्बहल्ला झाल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात कार्यालयातील इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात कोणतीच जीवीतहानी झालेली नाही किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

या हल्ल्याच्या घटनेनंतर भाजपनेते आक्रमक झाले असून राज्य व्यवस्थापन हल्ला रोकण्यास अयशस्वी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान स्थानिक नेत्यांनी या हल्ल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून पोलीस स्टेशन अगदी 100 मीटर अंतरावर असतानाही अशा घटना घडणं दुर्दैवी आहे. हे दुर्लक्ष नाही तर अपयश आहे. या सगळ्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सोशल मिडीयावर व्यक्त होत तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. भातखळकर ट्वीटमध्ये लिहितात, केरळच्या कन्नूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेला बॉम्ब हल्ला हा केरळच्या डाव्या सरकारने पोसलेल्या कट्टरवाद्यांचा कारनामा आहे. केंद्र सरकारने या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पोशिंद्याना ठेचून टाकावे असे म्हणून त्यांनी हल्ल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा…

काय….? डासांपासून होणार आता लवकरच सुटका

शिंदे गटात गेलेल्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी सुरूच

नगरपालिकांच्या निवडणुकांना ग्रहण; निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपचा पुढाकार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!