28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्राईमकर्मचाऱ्याला लागला शॉक ; पोलवरून पडला खाली पडून कर्मचारी जखमी

कर्मचाऱ्याला लागला शॉक ; पोलवरून पडला खाली पडून कर्मचारी जखमी

विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झाला आहे. घननिल मिशाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली. काम करताना अचानक तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

विजेच्या खांबावरून शॉक ( shocked) लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झाला आहे. घननिल मिशाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक employee shocked) लागून तो कोसळला. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली. काम करताना अचानक तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.( The employee was shocked; Employee injured after falling off pole)

यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालय हलविले. दरम्यान, याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का ?अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केले. दरम्यान, दुसऱ्या अधिकाऱ्यान तर आपणाला कल्पनाच नाही असं उत्तर दिलं. प्रश्नांची उत्तरे नसल्यानं अधिकारी वर्गाने हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाण पसंत केलं. दरम्यान, ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पहा.कंत्राटी कर्मचारी पोलवर चढुन काम करताना महावितरणचा पर्मनंट कर्मचारी कुठे होता ? हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे. कुणाच्या मार्गदर्शनान हे काम सुरू होतं ? अधिकारी, कर्मचारी अन् कंत्राटदार यात समन्वय नाही का ? हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना केल्यात. महावितरणनं कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी अस ते म्हणालेत. एकंदरीतच, महावितरणच्या बेजबाबदारापणामुळे आतापर्यंत अनेकांचे मनुष्यबळी गेलेत. आता तर कर्मचाऱ्यांचेही जीव धोक्यात आलेत. अधिकारी वर्ग कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत‌. याआधी आरोस, मालवणमध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉकबसून जीव गेलेत. त्यामुळे महावितरणमुळे होणाऱ्या जीवीत व वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण ? की मनुष्याचा जीवही कंत्राटी समजला जात आहे ? हे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार ? असा सवाल नागरिक आता करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी