27 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्राईमफायरिंग करणारा डिंगम गजाआड; दीड किलोमीटर केला पाठलाग

फायरिंग करणारा डिंगम गजाआड; दीड किलोमीटर केला पाठलाग

विनयभंग, गंभीर दुखापत व खुनाचा गुन्हा व खुनाचे तीन प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असूनही वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आले आहे. सहापेक्षा जास्त गंभीर गुन्हे असलेल्या संशयित रोहित गोविंद डिंगम उर्फ माले (वय २७, रा. फर्नांडीसवाडी, उपनगर) याला पिस्तुल व काडतुसासहित पथकाने दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन पकडले आहे. इंदिरानगर येथील चेतनानगरातील राज टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

विनयभंग, गंभीर दुखापत व खुनाचा गुन्हा व खुनाचे तीन प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असूनही वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक (arrested) करण्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आले आहे. सहापेक्षा जास्त गंभीर गुन्हे असलेल्या संशयित रोहित गोविंद डिंगम उर्फ माले (वय २७, रा. फर्नांडीसवाडी, उपनगर) याला पिस्तुल व काडतुसासहित पथकाने दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन पकडले (arrested) आहे. इंदिरानगर येथील चेतनानगरातील राज टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली.(The shooter, Dingum, was arrested; A one-and-a-half-kilometre chase)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटकाव करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना संशयित रोहित संदर्भात माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, गणेश वडजे, अर्चना भड, दत्तात्रय चकोर, देवकिसन गायकर आणि भूषण सोनवणे यांनी सापळा रचला. तर, १४ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता सिडकोतल्या पवननगरात हवेत गोळीबार झाला. त्यावेळी अंबड पोलिसांनी दोन दिवसांनी रोहितविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. पण, त्याला अद्याप अटक केली नव्हती.

त्या घटनेवेळी भाजपचे एक माजी नगरसेवकही तिथे होता, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. दरम्यान, विशेष पथक रोहितच्या मागावर असताना राणेनगर येथील इंदिरानगर परिसरातील चेतनानगरातील राज टॉवरमध्ये पोहोचले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोसायटीला वेढा घालत रोहितवर पाळत ठेवली. पोलिसांचा संशय आल्याने रोहित हा तेराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून पाइपने थेट टेरेसवर पोहोचला. टेरेसवरील पोलिसांनी धरण्याचा प्रयत्न करताच तो दुसऱ्या विंगच्या दिशेने पळाला. सोसायटीत पोलिसांनी चहुबाजुंनी त्याचा पाठलाग सुरु केला. एखाद्या सिनेमाप्रमाणे दृश्य असल्याने रहिवाशांनीही गर्दी केली. तर सोसायटीतून पळालेल्या रोहितला दीड किमी अंतरापर्यंत धावत पथकाने ताब्यात घेतले.

बेद गँगचा सदस्य
रोहित याला अटक केल्यावर विविध गुन्ह्यांबाबत अंमलदार संजय ताजणे, गणेश भामरे, भारत डंबाळे, रवींद्र दिघे, मंगला जगताप व सविता कदम यांनी चौकशी केली. त्याच्याविरुद्ध शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत इंदिरानगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, बऱ्याच महिन्यांपासून फरार असलेला रोहित पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. संशयित रोहित हा उपनगर येथील बेद गँगचा सदस्य आहे. मार्च २०२४ मध्ये पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिकरोड, उपनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या बेद टोळीविरुद्ध मोक्का लावला. त्यामध्ये रोहितचाही समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी