29.9 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरक्राईमतरुणीला विवस्त्र करून विडिओ केला व्हायरल ; पुण्यातील घटना

तरुणीला विवस्त्र करून विडिओ केला व्हायरल ; पुण्यातील घटना

पुण्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणीचे अपहरण करून तिची नग्नावस्थेतील ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याची निंदनीय घटना घडली आहे. आपल्या नात्यातील तरुणीला पळवून तिच्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून संबंधित तरुणाच्या बहिणीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला विवस्त्र करून तिला अमानुष मारहाण करण्यात आली. आणि तिची ध्वनीचित्रफीत काढण्यात आली. (The video went viral by undressing the young woman; Incident in Pune) या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यात संतापाची लाट पसरली आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली पुण्यात घडली आहे. त्यानंतर २४ वर्षीय बहिणीला विवस्त्र करुन खोलीत डांबून ठे‌वून मोबाइलच्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. या आरोपींनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत (vedio clip viral on social media) प्रसारित केली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

तक्रारदार महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांच्या नात्यातील एका तरुणीला तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा आरोपींना संशय होता. या संशयावरून आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. माटे यांनी नात्यातील तरुणीचा ठावठिकाणा विचारला. मात्र ते सांगण्यास दोघींनी ठाम नकार दिला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी या दोघींना गजाने मारहाण केली. एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मंत्र्यांचे चोचले पुरविण्यासाठी होणार १००० कोटींची उधळपट्टी !

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक मांडणार अंदाजपत्रक

सौदी अरेबिया करणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी