मोबाइल गेम्स हे आता केवळ मनोरंजन राहिलेले नाही. या गेम्सचं व्यसन समाजात वाढताना दिसतं. यातून गुन्हेदेखील घडत आहेत. बिहारमध्ये या कारणावरून एक गंभीर घटना उघडकीस आली. एक विवाहित महिला (wife) ऑनलाइन ल्युडो (Online Ludo) पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली.इकडे पतीनेदेखील दुसरा विवाह केला. आता ही महिला (wife) त्याच्या पतीकडे पोटगी मागत आहे.मोबाइल गेमच्या जाळ्यात अडकून केवळ मुलं चुका करतात असं नाही, तर आता प्रौढ व्यक्तीदेखील याला बळी पडू लागले आहेत. बिहारमधली एक विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो (Online Ludo) खेळत असताना गेम पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली.(The wife ran away with her boyfriend; Patty immediately brought another; The first came back and..)
दुसरीकडे पतीनेदेखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. आता प्रियकराकडून परत आलेल्या पत्नीने पतीकडे पोटगी मागितली आहे. पती-पत्नीचं हे विचित्र प्रकरण उघडकीस येताच गावात जोरदार चर्चा सुरू झाली. आता गावातले नागरिकक त्यांच्या स्तरावर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बिहारच्या भागलपूर जिल्ह्याच्या नवगछिया भागात दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो गेम खेळत असताना एका युवकाच्या प्रेमात पडली. ती युवकाच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली आणि पतीला सोडून युवकाकडे आली. प्रेमापुढे ती तिच्या मुलांनादेखील विसरली. प्रियकराच्या सांगण्यावरून ती त्याच्या उत्तर प्रदेशातल्या घरी पोहोचली. महिलेच्या पतीने तिला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. जेव्हा पहिल्या पत्नीला ही गोष्ट कळाली तेव्हा ती प्रियकराला सोडून थेट सासरी पोहोचली आणि तिने पोटगीची मागणी केली.
या प्रकरणी पत्नी पूजा कुमारीने सांगितलं, की `माझा विवाह 2017-18मध्ये बलहा इथल्या गौतम कुमारशी झाला. त्याची आई, बहीण आणि भावजय मला पाहू इच्छित नव्हत्या. त्या मला खूप त्रास देत होत्या. ऑनलाइन ल्युडो खेळत असताना मी माझ्या प्रियकराकडे पळून गेले ही माझी चूक आहे. तो यूपीचा असून त्याचं नाव विनोद आहे. माझ्यासोबत घटस्फोट न घेता गौतम कुमारने दुसरा विवाह केला आहे. माझ्या पतीने लपून दुसरा विवाह केला त्यावर माझा आक्षेप नाही. तो मला त्याच्यासोबत राहू देणार असेल तर माझी हरकत नाही; पण जर तो मला त्याच्यासोबत राहू देणार नसेल तर त्याने माझ्यासह मुलांचा खर्च उचलावा, ही माझी मागणी आहे. कारण मला अनेक आजार आहेत, त्यामुळे त्याने दिलेल्या पैशांतून मी माझं पालनपोषण करू शकेन.`
दुसरीकडे, पती गौतम कुमारने पहिल्या पत्नीला सोबत राहण्यास नकार दिला आहे. तो म्हणाला, की `माझा 2017मध्ये पूजा कुमारीशी विवाह झाला. 2022मध्ये मी घरी नसताना ती घरातून पळून गेली. ही माहिती मिळताच मी तिच्या शोधात सुरतला गेलो; पण ती सापडली नाही. मग मी हैदराबादला मजुरी करायला गेलो. दोन महिन्यांनंतर पत्नी माहेरून परतली. तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी मला कॉल करून तिची चूक झाली असं सांगितलं. हे ऐकून मी पत्नीला माफ केलं; पण पूजा तिच्या ऑनलाइन गेम फ्रेंडसोबत यूपीत राहून परत आली आहे, हे समजल्यावर या महिन्यात 17 तारखेला दुसरा विवाह केला. मी आता पूजा कुमारीला माझ्यासोबत राहू देणार नाही.