आयआरएस’चे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांना धमकी देण्यात आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणापासून समीर वानखेडे हे अधिकच चर्चेत आले आहेत. मात्र आता याच समीर वानखेडेंना ड्युटी करत असताना सोशल मीडियाद्वारे धमकीचा मेसेज आला आहे. हा मेसेज बांगलादेशहून आला असल्याचे उघडकीस आले आहे. यावेळी वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. ही तक्रार पोलिसांनी गोरेगाव पोलिसांकडे पाठवली आहे.
आयआरएस’चे आयुक्त समीर वानखेडे हे सध्या चेन्नई येथे आपली ड्युटी करत आहेत. अशावेळी त्यांना सोशल मीडियाद्वारे धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये आर्यन खान प्रकरणाबाबत लिहीले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. यावेळी मी ही माहिती मुंबई पोलिसांना मेलद्वारे दिली असल्याचे वानखेडे म्हणाले आहेत.
हेही वाचा
ड्रग्ज माफिया भूषण पाटीलला यूपीमधून अटक, ठाकरे गटाकडून दादा भुसेंवर आरोप
शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर? ठाकरेंचा शिवाजी पार्कवर
‘नरेंद्र मोदी बापात बाप लेकात लेक ठेवणार नाहीत,’ प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
मेसेजमध्ये भारताचा आणि भाजपचा उल्लेख
वानखेडेंना धमकीचा मेसेज आल्याने त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांना मेलद्वारे दिली आहे. ज्या नंबरवरून मेसेज आला तो नंबर ट्रेस केला असतां, हा नंबर बांगलादेशचा आहे. याच ठिकाणाहून मेसेज आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या मेसेजमध्ये भारत देश आणि भाजपचा उल्लेख केला आहे.
आर्यन खान प्रकरण
2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी झाली, असा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छाप्यात अनेकांना अटक केली. यावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील होता. त्यानंतर आर्यन खानला महिनाभर तुरुंगात देखील ठेवले. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका केली. याचवेळी समीर वानखेडे यांनी आर्यनच्या कुटुंबीयांकडून 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाला.