रुपल ओग्रे या ट्रेनी फ्लाईट अटेंडंटची रविवारी राहत्या घरात गळा चिरुन हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती. आरोपी विक्रम याला अंधेरी येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र आरोपीने कोठडीमध्येच आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले असून खळबळ उडाली आहे.
24 वर्षीय रुपल ओग्रे या ट्रेनी फ्लाईट अटेंडंटची रविवारी तिच्या फ्लॅटमध्ये गळा चिरुन हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवित विक्रम अटवाल याला अवघ्या आठ तासांत अटक केली होती. रुपल राहत असलेल्या सोसायटीत विक्रम अटवाल घरसाफ सफाईचे काम करत असे. त्याचे रुपलसोबत काही कारणांतून खटके उडाले होते. याच रागातून त्याने रुपलची हत्या केली होती. रुपलवर बलात्काराचा प्रयत्न देखील त्याने केला असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी विक्रम याने रुपलच्या गळ्यावर धारधार चाकूने वार करुन तीची हत्या केली होती.
हे सुद्धा वाचा
भूमि पेडणेकरचा फिमेल ऑर्गजमवर भाष्य करणारा थंक्यू फॉर कमिंग; युट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरचा 1.6 कोटी व्ह्यूज
प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली; उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून ऐकल्या व्यथा
आवाज वाढीव डीजे तुझ्या… पुण्यात डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी
रुपल आपली बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती. काही कामानिमित्त तिची बहिण आणि प्रियकर आपल्या छत्तीसगढ मधील मुळ गावाकडे गेले होते. याच दरम्यान रुपलची रविवारी (दि.4) रोजी विक्रमने हत्या केली होती. याप्रकऱणी पोलिसांनी विक्रमला अटक केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपी विक्रमला पोलीस कोठडी सुनवाली होती. विक्रमला अंधेरी पोलिस ठाण्यात पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी साधारण 6.30 ते 7.30 वाजेच्या सुमारास विक्रमने कोठडीतच आत्महत्या केल्याचे आढळून आले.