त्र्यंबकेश्वर येथील बिल्व तिर्थ तलावावर धुणं धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा ( lake) मृत्यू घडल्याची दुर्दयी घटना घडली आहे. त्र्यंबक नगर परिषद तीन दिवसांत एकदा पाणी पुरवठा करत आहे. तो देखील अनियमित व अपुरा असल्याने नागरिक मिळेल तेथून पाणी आणतात, धुणं धुतात याचा हा बळी( lake) ठरला आहे.(Two girls drown in lake while going to wash their dhuna)
त्र्यंबकेश्वर येथील तनुजा युवराज कोरडे, वय 13 वर्षे चौकीमाथा, अर्चना बाळू धनगर, वय 13 वर्षे चौकिमाथा या दोन मुली सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिल्व तीर्थ येथे धुणं धूत असताना पाय घसरल्याने अर्चना पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील बुडाली.ही माहिती मिळताच नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली.
मुलींना बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्या मयत झाल्या होत्या. बिल्व तिर्थ तलाव काही वर्षापूर्वी गाळ व मुरूम काढून खोल केला तेव्हा पासून येथे पाण्यात बुडून जीवित हानी होण्याच्या घटना घडत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर येथे नळ पाणीपुरवठा वेळेत होत नाल्याने अशा प्रकारे नागरिक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत.