29 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरक्राईमधक्कादायक : पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले

धक्कादायक : पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले

बीड जिल्ह्यात एका २६ वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. (Young man set himself on fire in the premises of the police station) लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या आवारात या तरुणाने स्वतःला पेटवून घेतले. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राजपाल कचजरू बनसोडे असे या तरुणाचे नाव असून तो अंबाजोगाई लातूर येथील एल.आय. सी. कॉलनी येथे राहतो.
राजपाल बनसोडे सोमवारी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाला. त्याने स्वतःला अचानक पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत राजपालला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तो ३० टक्के भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजपाल बनसोडे याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अप्पर पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हे सुद्धा वाचा

BMC: मुंबईत पाणीबाणी! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आता २५ लाख रुपये; २७ नवांचा सरकारकडे प्रस्ताव नव्या नावांवर देखील विचार

बजेट २०२३ : ‘सेक्स’वर कर, तुमच्या आत्म्यावरही कर ; या आहेत जगातील जुलमी कर पद्धती

 

आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अस्पष्ट
राजपाल बनसोडे याने पोलीस आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला. यामागे नेमके कोणते कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमागे कौटुंबिक कारण आहे, का छळवणुकीचे कारण आहे. का अन्य कोणते कारण आहे ते पोलीस तपासात उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी