26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeक्राईमनाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात भामट्यांनी दोन तरुणांची सुमारे 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व त्याचा साक्षीदार या दोन तरुणांशी वेगवेगळ्या व्हॉट्सअप क्रमांकधारक आरोपींनी संपर्क साधला. नंतर या दोन तरुणांना स्टॉक डिसेक्शन ग्रुप व मोमेंटम स्टॉक कम्युनिटी अशा नावांनी स्थापन केलेल्या व्हॉट्सअपग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयित आरोपींनी अप्पर सर्किटच्या स्टॉकबद्दल फिर्यादी व त्याच्या साक्षीदाराला वेळोवेळी माहिती दिली.

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात भामट्यांनी दोन तरुणांची सुमारे 79 लाख रुपयांची फसवणूक (duped) केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व त्याचा साक्षीदार या दोन तरुणांशी वेगवेगळ्या व्हॉट्सअप क्रमांकधारक आरोपींनी संपर्क साधला. नंतर या दोन तरुणांना स्टॉक डिसेक्शन ग्रुप व मोमेंटम स्टॉक कम्युनिटी अशा नावांनी स्थापन केलेल्या व्हॉट्सअपग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयित आरोपींनी अप्पर सर्किटच्या स्टॉकबद्दल फिर्यादी व त्याच्या साक्षीदाराला वेळोवेळी माहिती दिली.(Youth duped of lakhs of rupees by forcing them to take stock, IPO in Nashik)

त्यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या बनावट कर्मा कॅपिटल ट्रेडिंग, व्हाईट व यांसारख्या प्लॅटफॉर्मवर दोघा तरुणांना खाते सुरू करण्यास भाग पाडले.

स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा (duped)
कालांतराने या अपवर विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्याकरिता आरोपींनी दिलेल्या विविध बँकांच्या खात्यांवर फिर्यादी व साक्षीदार यांना 7 लाख 15 हजार इतकी रक्कम गुंतविण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादी व साक्षीदार यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 ते दि. 15 मार्च 2024 या कालावधीत इंटरनेट, फोन व बँक खात्यांद्वारे वेळोवेळी 78 लाख 78 हजार 600 रुपये इतकी रक्कम आरोपींनी सांगितल्याप्रमाणे जमा केली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमेची गुंतवणूक करूनही अपेक्षित फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी