28 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरक्राईमयूट्यूब व्हिडीओ लाइक केला अन् 42 लाख रुपयांचा लागला चुना

यूट्यूब व्हिडीओ लाइक केला अन् 42 लाख रुपयांचा लागला चुना

सायबर भामट्यांनी दिल्लीतील टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट आयटी व्यावसायिकाची केली फसवणूक; गुंतवणुकीवर जास्त रिटर्न्स मिळण्याचा लोभ करून गेला बँक खाते रिकामे

यूट्यूब व्हिडीओ लाइक केला अन् 42 लाख रुपयांचा लागला चुना अशी घटना गुरूग्राम येथे घडली. सायबर भामट्यांनी दिल्लीतील टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट आयटी व्यावसायिकाचीच फसवणूक केली. गुंतवणुकीवर जास्त रिटर्न्स मिळण्याच्या लोभ त्याचे बँक खाते रिकामे करून गेले.

आयटी प्रोफेशनलला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला, ज्यामध्ये त्याला अतिरिक्त उत्पन्न कमवण्यासाठी अर्धवेळ नोकरीची ऑफर देण्यात आली. त्यासाठी टेलीग्राम ग्रुपमध्ये जॉईन होण्यास सांगितले गेले. त्यानंतर काही YouTube व्हिडिओ लाईक करण्यास सांगितले गेले. त्यातून थोडी गुंतवणूक करून अधिक खात्रीशीर परतावा मिळेल, असे आमिष दाखविले गेले.

गुरुग्राम सेक्टर 102 मधील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करणाऱ्या तरुणाला 24 मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर अर्धवेळ नोकरीची ऑफर देणारा संदेश आला. यूट्यूबवर व्हिडिओ लाईक करून तो अतिरिक्त कमाई करू शकतो, असे त्याला सांगण्यात आले. नंतर त्याला टेलिग्रामवरील एका ग्रुपात जोडले गेले. या ग्रुपची ॲडमिन दिव्या नावाची कुणीतरी महिला असावी. हा फसविला गेलेला तरुण ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच कमल, अंकित, भूमी आणि हर्ष या ग्रुपमध्ये आधीच असलेल्या मेंबर्सनी त्यांना भरपूर इन्कम रिटर्न्स मिळत असल्याचे किस्से सांगितले. त्यांनी जास्त रिटर्न्ससाठी चांगली रक्कम गुंतवण्यास तरुणाला प्रवृत्त केले.

इतर ग्रुप मेंबर्सच्या भूलथापा, आश्वासने आणि भरपूर इन्कम मिळत असल्याच्या बनावट स्क्रीनशॉट्सला हा तरुण आयटी व्यावसायिक बळी पडला. एका टास्कच्या बहाण्याने त्याने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या आणि पत्नीच्या बँक खात्यातून मिळून वेळोवेळी एकूण 42 लाख 31 हजार 600 रुपये ट्रान्सफर केले.

हे सुध्दा वाचा : 

अॅपवरुन कर्ज घेतले; सायबर गुंडाने नग्न फोटो व्हायरल करत उकळले लाखो रुपये

केवायसी फ्रॉड पासून सावध रहा; सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

आधार कार्डमुळे फसवणूक टाळायची असल्यास लवकर हा क्रमांक अपडेट करा

नंतर या तरुणाला संशय यायला लागला. मात्र, त्याने 69 लाख रुपये नफा कमावला आहे, असे त्याला बनावट गुंतवणूक ॲपमधील रेकॉर्डसमध्ये दाखविण्यात आले. त्याने जेव्हा आपले गुंतवलेले व नफ्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला नकार देण्यात आला. त्याच्याकडून आणखी ठेवी मागितल्या गेल्या. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या आयटी व्यावसायिक तरुणाने पोलिसांकडे जाऊन टेलिग्राम ग्रुपमधील फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अज्ञात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

YouTube Video Like Scam, Cyber Crime, Online Trap, Investment Returns Fraud, YouTube Like Online Job Cheating

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी