मंत्रालय

दावोस जागतिक आर्थिक परिषद, राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

जागतिक आर्थिक परिषद गेले तीन दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्रासाठी ही परिषद आर्थिक दृष्टा प्रगतीच्या दिशेने जात आहे. या जागतिक आर्थिक परिषदेच्या सलग तिसऱ्या दिवशी उर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले.

टीम लय भारी

दावोस : जागतिक आर्थिक परिषद (Davos World Economic Council) गेले तीन दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्रासाठी ही परिषद आर्थिक दृष्टा प्रगतीच्या दिशेने जात आहे. या जागतिक आर्थिक परिषदेच्या सलग तिसऱ्या दिवशी उर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. (Davos World Economic Council)

दावोस जागतिक आर्थिक परिषद, राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

उर्जा निर्मितीसाठी ५० हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी रि न्यू पॉवर कंपनीने राज्य शासनासोबत करार करण्यात आला. कंपनीचे संचालक सुमंत सिन्हा उपस्थित होते. याद्वारे राज्यात दहा ते १२ हजार मेगा वॅट उर्जा निर्माण होणार आहे. याशिवाय आज इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे १.५ बिलियन युएसडी गुंतवणुकीसाठी करार केला. याशिवाय वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीसंबधी अमरा राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्यासोबत (Davos World Economic Council) चर्चा करण्यात आली.

दावोस जागतिक आर्थिक परिषद, राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्या सोबत सामंजस्य (Davos World Economic Council) करार केला, याप्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, सचिव (शालेय शिक्षण) रणजित सिंग देओल व बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन व दिव्या रवींद्रन उपस्थित होते. शिवाय राज्याने जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप यांचे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. २०१८ मध्ये एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र (Davos World Economic Council) हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा :- 

WEF 2022: Here’s what will happen on Day 3 at Davos Annual meeting

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये ‘फोटोवॉर’

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close