29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकृष्णा नदीत पुन्हा आढळले मृत मासे

कृष्णा नदीत पुन्हा आढळले मृत मासे

टीम लय भारी

सांगली : कृष्णा नदीत(Krishna River) गेल्या काही दिवसांपासून मृत मासे(Dead Fish) मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सहा दिवसांपूर्वीच कृष्णा नदीच्या पात्रात मृत मासे सापडल्यानंतर आता पुन्हा या नदी पात्रात मृत मासे सापडले आहेत. त्यामुळे या घटनेविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आज बुधवारी (दि. २० जुलै २०२२) कृष्णा नदी काठावरील कसबे डिग्रज येथील बंधाऱ्याच्या ठिकाणी हजारो मासे तडफडून मरण पावले आहेत.

दरम्यान, दरवेळेस या नदी पात्रात मृत मासे सापडत असल्याने आणि याचे कारण अद्यापही कळू शकत नसल्याने या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पण प्रदूषण महामंडळ आणि मत्स्य विभागाकडून नदीतल्या माशांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे नदीतील मासे नेमके कशामुळे मृत्यू पावत आहेत ? याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

अशाच प्रकाराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी भिलवडीच्या आमणापूरपासून सांगलीच्या हरिपूरपर्यंत कृष्णाकाठी मृत माशांचा खच पडला होता. म्हणून हे मासे पकडण्यासाठी या नदी काठावर अनेक लोकांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर प्रदूषण महामंडळाने नदीच्या पात्रातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच आज देखील घडलेल्या या मृत माशांच्या घटनेनंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

गो फस्ट ‘विमानाची’ काच तुटली

बाॅलीवूडवर पुन्हा ईडीचे संकट, ‘पॅडमान’ निर्माती प्रेरणा अरोरा अटकेत

धनंजय मुंडेंनी केले ‘ओबीसी ‘आरक्षणाचे स्वागत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी