29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या पोलीस आयुक्तांचा भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश

नाशिकच्या पोलीस आयुक्तांचा भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश

टीम लय भारी 

मुंबई:  सध्या महाराष्ट्रात भोंग्यावरुन राज्यभरात वातावरण तापलं आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Deepak pandey) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. Deepak pandey ordered on loudespeaker

सर्व धार्मिक स्थळांनी 3 मेपर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, अन्यथा भोंगे उतरवले जातील

मंदिर,मस्जिद,चर्च, गुरुद्वारा यांना लागू

अजानच्या 15 मिनिटं आधी व नंतर शंभर मीटर परिसरात हनुमान चालीसा किंवा इतर भोंगे वाजवण्यास मनाई

सकाळची पाच वाजेची अजान न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घ्यावे

भोंग्यांसाठी न्यायालयाने ठरवून दिलेली आवाजाची पातळी पाळावी लागेल

आदेशाचे पालन न केल्यास कमीत कमी चार महिने तुरूंगवास आणि तडीपारीची कारवाईसुद्धा होवू शकते

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय केलेल्या घोषणेनंतर राज्यात एकच वाद सुरु झाला आहे. 3 मे पर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. Nashik police commissioner Deepak pandey ordered

हे सुध्दा वाचा: 

‘शरद पवार यांचे आभार कारण मी त्यांच्यामुळे डॉक्टर झालो’

Nashik: Burglars steal from house using key hidden in shoe

महाराष्ट्रात भोंगा आणि हनुमान चालिसावरुन राजकीय चकमक सुरू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी