महाराष्ट्र

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, जो नडला त्याला तोडला : दिपाली सय्यद

राणा दाम्पत्यांवरील कारवाईनंतर आता शिवसेनेवर चहुबाजुंनी टीका होत आहे. या टीकेवर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि इथे जो नडला त्याला फोडला, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टीम लय भारी

खालापूर : राणा दाम्पत्यांवरील कारवाईनंतर आता शिवसेनेवर (Shivena) चहुबाजुंनी टीका होत आहे. या टीकेवर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayad) यांनी ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि इथे जो नडला त्याला फोडला, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खालापूर तालुक्यातील मोंटेरिया रिसॉर्टमध्ये दिपाली सय्यद यांनी पत्रकारांशी सवांद साधला. (Deepali Sayad Citicize On BJP)

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, जो नडला त्याला तोडला : दिपाली सय्यद

या वेळी दिपाली सय्यद (Deepali Sayad) म्हणाल्या की, राणा दाम्पत्य तुरुंगात गेल्यानंतर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा हवी असल्यासारखी तऱ्हा झाली आहे. त्यांना घुटमळतंय, पोलीस त्रास देताहेत, अरे बाबांनो ते फाईव्ह स्टार होटेल नाही तर ती न्यायालयीन कोठडीत आहेत, हे सांगण्याची आता वेळ (Deepali Sayad) आली आहे.

तसेच किरीट सोमैया हा जरा काही झालं की दिल्ली, जरा काही झालं की मोदी यामध्ये गुरफटलेले आहेत, यांना लोकशाही माहीतच नाही का ? आपल्या तक्रारी राज्य सरकारपर्यंत विचार करून आपणास न्याय न मिळाल्यास दिल्ली वाऱ्या करा. मात्र, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपची ही माकडे उड्या मारत आहेत. यावेळी शिवसैनिकांवर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि ‘इथे जो नडला त्याला फोडला हाच मार्ग आणि हीच शिकवण आमची राहणार आहे’ असे व्यक्तव्य दिपाली सय्यद (Deepali Sayad) यांनी केले.

हे सुद्धा वाचा :- 

Marathi Actor Deepali Syed’s Latest Lip-syncing Reel is a Hit Among Fans

नवनीत राणांचा कोठडीत छळ झालेला नाही : दिलीप वळसे पाटील

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close