28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनशिक्षकांच्या प्रशिक्षणात शिक्षण विभाग फेल, तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण स्थगित

शिक्षकांच्या प्रशिक्षणात शिक्षण विभाग फेल, तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण स्थगित

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण (Online Training) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने दिनांक 2 जून 2022 पासून वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणीचे सुरू करण्यात आले. आलेले प्रशिक्षण तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर यूजर आयडी, पासवर्ड न मिळणे, प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाहताना अडचणी येणे, सततचे बफरिंग, प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून असाइनमेंट अपलोड न होणे इत्यादी अनेक घटना घडल्या. (Department of Education fails in teacher training)

शिक्षण विभागाने इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲपच्या मदतीने सुरू केलेल्या प्रशिक्षणाचा राज्यातील 94541 शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. नेट पॅक संपेपर्यंत प्रशिक्षण घेऊनही प्रशिक्षणाचा पहिला दिवस वाया गेला. आता हे प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर पुन्हा करावे लागणार आहे. वेळ आणि नेट पॅकचा अपव्यय होणार आहे.

या सर्व प्रकाराचा शिक्षक भारती निषेध करते. शिक्षण विभागाने गेली अनेक वर्ष प्रशिक्षण न घेतल्यामुळे लाखो शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळालेली नाही. 2000 रुपये शुल्क भरून सुरू करण्यात आलेले हे प्रशिक्षण सर्वांना त्रासदायक ठरत आहे. शिक्षक भारतीने प्रशिक्षणातील तांत्रिक अडचणी दूर करून प्रशिक्षण मुदतवाढ करावी आणि विविध मुद्द्यांच्या बाबत तातडीने बदल करणे आवश्यक असल्याबाबतचे पत्र शिक्षण मंत्र्यांना पाठवले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

सदर प्रशिक्षणाच्या बाबतीत तांत्रिक अडचणी उद्भवल्या मुळे सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीत खालील मुद्द्यांबाबत तातडीने विचार करून निर्णय घेण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

शिक्षक भारतीच्या मागण्या

1) वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण मराठी सह इंग्रजी उर्दू आणि हिंदी भाषेतही असावे.

2) वरीष्ठ वेतनश्रेणी आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम एकच आहे का?

तसेच चित्रकला, क्रीडा व संगीत शिक्षकांनी हेच प्रशिक्षण घ्यायचे का?
या प्रश्नांचा खुलासा करावा.

3) यूजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर मार्गदर्शन करावे. ज्या शिक्षकांना अद्यापही युजर आयडी व पासवर्ड मिळालेला नाही त्यांना तातडीने मदत करावी.

4) 55 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांना सदर प्रशिक्षणातून वगळावे.

5) प्रशिक्षण कालावधीची मर्यादा एक जुलै पर्यंत मर्यादित न करता प्रशिक्षण निरंतर सुरू ठेवावे.

6) एकाच वेळी 94541 शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू करण्याऐवजी 25000 शिक्षकांचा एक गट याप्रमाणे चार गटात विभागणी करून प्रशिक्षणाचे नियोजन करावे. शिक्षकांना आपले असाईनमेंट अपलोड करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

7) प्रशिक्षणासाठी नोंदणी करू न शकलेल्या शिक्षकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करून निरंतर ऑनलाईन प्रशिक्षण सुरू ठेवावे.

8) 30 मे 2022 पर्यंत निवृत्त झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी चे लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा.

आमदार कपिल पाटील प्रशिक्षणातील तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबतीत शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहेत असेही सुभाष मोरे यांनी सांगितले.


हे सुद्धा वाचा :

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार : धनंजय मुंडे

पनवेल ही नावाजलेली महापालिका होईल : देवेंद्र फडणवीस

गोपीनाथ मुंडे मोठ्या मनाचा माणूस : आमदार जितेंद्र आव्हाड

‘पुण्यश्लोक मातेचा उल्लेख महाराणी अथवा राजमाता करु नका असे सुचविले तर एवढ्या मिरच्या लागायचे कारण काय ?’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी