34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईउपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. रविवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखील काळजी घेण्यास सांगितले आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारणाच्या गदारोळाबाबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी या सर्व घडामोडीत भाजपचा हात नसल्याचे सांगितले होते. पण त्यांच्या या विधानाचे शरद पवार यांनी खंडन केले होते.

अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.’

शरद पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्यांचे खंडन केल्यानंतर त्यांनी सुद्धा या सत्तानाट्यावर बोलण्याचे टाळले आहे. महत्वाचे म्हणजे एखाद्या नेत्याला आपल्यावर एखादे संकट येण्याची चाहूल लागली की त्या नेत्याला नेमकी त्याचवेळी कोरोनाची लागण होते. त्यामुळे खरंच त्या नेत्याला कोरोना झाला आहे की नाही याबाबत जनतेमध्ये साशंकता निर्माण झालेली आहे. राज्यात सत्तानाट्य सुरु होताच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते आणि आता उपमुख्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

हे सुद्धा वाचा :

बंडखोरांची 11 जुलैपर्यंत वाढली धडधड

भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले, विठ्ठलाच्या महापुजेचा मान उद्धव ठाकरेंकडेच !

संजय राऊतांचे तोंड बंद करण्यासाठी विरोधकांनी ‘ईडी’ला केले पुढे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी