33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईमहाराष्ट्र दिनी 'देवेंद्र फडणवीस' देणार आघाडी सरकारला बुस्टर डोस

महाराष्ट्र दिनी ‘देवेंद्र फडणवीस’ देणार आघाडी सरकारला बुस्टर डोस

टीम लय भारी

मुंबई : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनीही लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले. परंतू आता, भाजपकडूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही सभा होत असून बुस्टर डोस, असं नाव या सभेला देण्यात आलं आहे. आमदार अँड आशिष शेलार यांनी आज या सभेविषयी महिती दिली आहे.(Devendra Fadnavis will give booster dose government on Maharashtra Day)

कोरोना नंतर भव्य दिव्य स्वरूपात भाजपातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जाणार आहे. १ मे रोजी संध्याकाळी ५  वाजता मुंबईतील सोमय्या मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम होणार असून भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख (Devendra Fadnavis) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. गेल्या काही दिवसात मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते अनेक घोटाळ्यापर्यंत अनेक मुद्यांवर देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत. असे आशिष शेलार यांनी म्हटलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे होणारे तडाखेबाज भाषण म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना “बुस्टर डोस” असेल तर महाविकास आघाडीला “डोस” असेल असे आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसात मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून (Devendra Fadnavis) भाजपाच्या पोलखोल सभांवर अती “विराट”म्हणजे एक दोन कार्यकर्ते दगड मारीत आहेत, त्याचा समाचार घेऊन मुंबईसह राज्याच्या विषयांवर सत्ताधारी पक्षाला “डोस” देणारी ही सभा असेल असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.

हे सुद्धा वाचा :-

Mumbai: BJP to hold ‘Booster Dose’ rally on Maharashtra Day to train guns at MVA leaders

राज्य सरकारने कोणताही कर वाढविला नाही, उलट गॅसवरील कर कमी केला : अजित पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी