30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रहनुमान चालिसा म्हटली तर काही लोकांना राग का येतो? : देवेंद्र फडणवीसांचा...

हनुमान चालिसा म्हटली तर काही लोकांना राग का येतो? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कुणाला भगव्याचा कितीही तिटकारा असला तरी आम्ही शिवछत्रपतींचा भगवा पुढे घेऊन जाणार. भगवा हा आमचा श्वास आहे. हनुमान चालिसा म्हटली तर काही लोकांना राग का येतो? कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाही पण लांगूलचालन करण्याला आमचा विरोध आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis’s question from Hanuman Chalisa)

कोल्हापूरमधून भाजपचा 107 वा आमदार निवडून येणार

कोल्हापूरमधील अनेक विकास कामे आम्ही दाखवू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारने एकही काम केले नाही.सत्यजित कदम हे 107 वे भाजपा आमदार म्हणून निवडून येतील.पंढरीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, आता आई अंबाबाईचा सुद्धा आशीर्वाद मिळणार , असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला

कुठल्याही नेत्यांच्या घरावर हल्ला होणे, हे निषेधार्ह

कुठल्याही नेत्यांच्या घरावर हल्ला होणे, हे निषेधार्ह.पण माझा पुन्हा सवाल आहे.पत्रकार पोहोचतात मग पोलिस का नाही? पोलिसांचे अपयश लपविण्यासाठी इतरांवर आरोप केले जात आहेत का ?,अशी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.

25 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी खिताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांना मिळाला आहे.भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना 5 लाख रुपये पुढच्या सरावासाठी देण्याचा निर्णय सुद्धा भाजपाने घेतला आहे,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उत्तर कोल्हापूर मतदारसंघात भाजपाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे.येथील महाविकास आघाडीच्या दहशतीला झुगारून लोक भाजपलाच मतदान करतील, यात शंका नाही.महाविकास आघाडी सरकारबद्दल संपूर्ण राज्यात जनतेच्या मनात मोठी चीड आहे.या सरकारने कोल्हापुरात पुराची मदत दिली नाही.कोविडच्या काळात गोकुळची निवडणूक घेण्यासाठी लोकांना मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हे सुद्धा वाचा :  

Devendra Fadnavis : प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दहा निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला – फडणवीस

कोल्हापूर पोटनिवडणूकीतून महाविकास आघाडीला घरी पाठवू : देवेंद्र फडणवीस

Maha: Shiv Sena has become pseudo-secular, says Fadnavis citing calendar in Urdu

किला कोर्टात रंगला, अॅड. सदावर्ते, आंदोलक आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी