30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना मोठे यश

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना मोठे यश

टीम लय भारी 

मुंबई:  सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. मुंडेंच्या प्रयत्नांना यश आले आहे.Dhananjay munde cabinet meeting

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल 500 कोटी वरून वाढवून 1000 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 300 कोटी वरून 1000 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 73.21 कोटी वरून 1000 कोटी आणि दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटी वरून 500 कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने चारही भागभांडवल वाढवल्यामुळे अनुसूचित जातीतील घटकांना याचा फायदा होणार आहे. या महामंडळांच्या लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कौशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार असल्याचे सामाजिकन्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा: 

धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ‘मिशन वात्सल्य आणि बाल संगोपन मेळावा’ संपन्न

Allegations Against Maha Minister Dhananjay Munde Serious, Says NCP Chief Sharad Pawar

योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आपण महाराष्ट्रात राहतो !

b

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी