33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयराज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव:  धनंजय मुंडे

राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव:  धनंजय मुंडे

टीम लय भारी 

मुंबई:  सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंचा अर्धवटराव असा उल्लेख केला आहे. एका प्रचार सभेत त्यांनी म्हटले की, अर्धवटराव आधी म्हणायचे मला फक्त भिती शरद पवार यांची वाटते. मधल्या काळात यांनी भाजपविरोधात खूप सीड्या लावल्या. यातच ईडी घुसली. याचा परिमाण असा झाला की अर्धवटराव गप्प बसले, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या भाषणात ते म्हणतात की पूवी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ राज्यात प्रसिद्ध होता. सध्या राज्यात भाजपच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरु आहे.लाव रे ती सीडी’ म्हणणारे आता सगळे विसरून गेले आहेत.

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. राज ठाकरे यांची ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी पक्ष्याचा एक दिवस मुख्यमंत्री होणार आहे. राष्ट्रवादीचे शंभरच्यावर आमदार निवडणूक येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 हे सुद्धा वाचा:

हा दिवस माझ्यासाठी दसरा-दिवाळी पेक्षा मोठा ठरला  : धनंजय मुंडे

Maharashtra Min Dhananjay Munde Admitted to Mumbai Hospital After Suffering Minor Heart Attack

बाटलीतल्या गंगाराम सोबत पंगा घेणारा ‘कवट्या महाकाल’ आहे तरी कोण?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी