29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबई2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण करणार...

2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण करणार :  धनंजय मुंडे

टीम लय भारी 

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्याधुनिक स्मारक २०२३ अखेरपर्यंत किंवा २०२४ सालच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी  केल्यानंतर म्हटलं आहे. दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक नियोजित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. dhananjay munde on Dr ambedkar memorial

इंदूमिलमधील डॉ. आंबेडकरांचे स्मारकाचे २०१६ साली हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत सहाशे कोटी होती. गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने स्मारकासाठी पुढे येऊन काम केले आहे. आतापर्यंत २४५ कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी या वर्षी प्रकल्पासाठी राखून ठेवला आहे. सदर प्रकल्पासाठी ३०० कोटींचा खर्च झाला असून त्या निधीची तरतूद सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल बैठक आयोजीत करण्यात आली आहे. याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनीवासन,समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशि प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. dhananjay munde on Dr ambedkar memorial

हे सुद्धा वाचा: 

योगींच्या राजवटीत दलित सुरक्षित नाहीत :  महेश तपासे

‘There Should be Lakshman Rekha, Court Should Respect Govt…’: Rijiju as SC Puts Sedition Law on Hold

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी