28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांचा कल्पक उपक्रम, सामान्य लोकांच्या योजना तळागाळात पोचविणार !

धनंजय मुंडे यांचा कल्पक उपक्रम, सामान्य लोकांच्या योजना तळागाळात पोचविणार !

टीम लय भारी

मुंबई : १ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना राबवण्यात येणार आहे. झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. Dhananjay Munde organise special activity

जिल्ह्यांच्या ठिकाणी त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना  तळागाळातील नागरिकांना माहिती पडणार आहे. या कल्याणकारी योजनांचा फायदा समाजातील अनेक घटकांना मिळणार आहे.

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. Dhananjay Munde organise special activity

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असून, समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्या मार्फत या अभिनव उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा: 

राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव:  धनंजय मुंडे

After the FIR was registered at Malabar Hill police station, the case was transferred to the crime branch of Mumbai Police for further investigation

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी