34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांनी घेतली खरीप हंगामाच्या नियोजनाची बैठक

धनंजय मुंडे यांनी घेतली खरीप हंगामाच्या नियोजनाची बैठक

टीम लय भारी

बीड: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकवतो आणि तोडतो सुद्धा, त्याला शासनाच्या सोयी  सुविधा वेळेवर मिळाल्या तर सोने पिकवील, अशा भावना मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.Dhananjay Munde organised meeting

पीक कर्जाचे उद्दिष्ट 400 कोटींनी वाढवून खरीप व रब्बी मिळून सुमारे 2100 कोटी करावे तसेच यावेळी पतपुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या मॅनेजरवर फौजदारी गुन्हे दाखल करावा असे त्यांनी सदर बैठकीत म्हटलं आहे. अशा सूचना  देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

जिल्ह्यात उर्वरित 100% ऊस गाळप करण्यासाठी राज्य शासनाने जबाबदारी घेतली आहे. सर्व कारखान्यांनीही यासाठी सहकार्य करावे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते म्हणतात की, शेतकऱ्यांना हारवेस्टर व अन्य यंत्रणा उपलब्ध करून दिल्या जातील. Dhananjay Munde organised meeting

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांसह खतांची टंचाई होणार नाही याचे सूक्ष्म नियोजन करण्याचेही निर्देश कृषी विभागाला दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभातून ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करण्याच्या सूचना यावेळी मुंडे यांनी  दिल्या आहेत.

जिल्ह्यात सीताफळ ही नैसर्गिक देणगी आहे. फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत या फळपिकासाठी अनुदान व योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभाग व जिल्हा प्रशासन संयुक्त पाठपुरावा करणार आहे.

हे सुद्धा वाचा: 

नाटक, नाटक असतं, तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं : खासदार सुप्रिया सुळे

Mumbai: Court adjourns decision in Rana couple’s bail hearing

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी