29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे ?

आनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे ?

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदेंची कामाची शैली ही आनंद दिघेंच्या कार्याशी सुसंगत आहे. पक्ष बांधणी, निवडणुकीची रणनीती तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ठाण्यात शिवसेना उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारणात ते खालपासून वर गेले. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जातो. आनंद दिघे नंतर हा गड एकनाथ शिंदेंनी उत्तम प्रकारे सांभाळला. मात्र आता एकनाथ शिंदेनंतर ठाण्याची धूरा कोणाकडे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

विधान परिषदेचा निकाल हे राज्यातील राजकारणाचे परिवर्तन असल्याचे विधान काल देवेंद्र फडणवीसांनी केले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सोडा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत यावे. काॅंग्रेस, रा.काॅंग्रेसची साथ सोडावी. त्यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदेच्या मनात ही खदखद गेल्या अनेक दिवसांपासून होती. अनेकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.

शिवसेना पक्ष बांधणीमध्ये एकनाथ शिंदेचा मोठा मोलाचा वाटा होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना डावलण्यात आले होते. गटनेतेपद असून देखील त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचे नाव सुचवले होते. या प्रस्तावाला सुभाष देसाई आणि संजय राऊत यांनी विरोध केला. त्यामुळे एकनाथ शिंदे दुखावले गेले. विधी मंडळातील सर्वाधिक आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदे यांना नेहमीच असायचे. तसेच शिवसेनेमधील ते एक लोकप्रिय नेते होते. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होईल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्या पेक्षाही मोठे नुकसान शिंदेंच्या जाण्याने होवू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडू नये हीच इच्छा शिवसैनिकांची होती. अनेक शिवसैनिकांनी माध्यमांसमोर बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. शिवसेनेत एक विस्कळीतपणा आला होता.

1991 मध्ये नागपूर अधिवेशनाच्यावेळी छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यानंतर नारायण राणेंनी 2005 साली शिवसेनेला रामराम केला. तर ठाकरे कुटुंबातील सदस्य असलेल्या राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसे हा नवा पक्ष तयार केला. त्यामुळे शिवसेनेला हे पाचवे मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

‘त्या’ आमदारांच्या जीवाला धोका

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद हवे होते

भाजपचे नेते ‘बांधणी‘ करत होते; तेव्हा महाविकास आघाडीचे नेते ‘झोपा‘ काढत होते !आनंद दिघे नंतर हा गड एकनाथ शिंदेंनी उत्तम प्रकारे सांभाळला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी