31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रभोंगे लाऊडस्पीकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी : दिलीप वळसे पाटील

भोंगे लाऊडस्पीकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी : दिलीप वळसे पाटील

टीम लय भारी :

मुंबई : महाराष्ट्रात सध्या भोंग्यावरुन  राजकारण तापलं आहे. भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walase Patil) यांनी दिलेत. भोंगे लाऊडस्पीकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे आवाहव गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेत. भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात दुपारी वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. (Dilip Walase Patil Dicision on bhonga)

‘पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.’ गृहमंत्र्यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं आहे की, ‘कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’ असे दिलीप वळसे (Dilip Walase Patil) पाटील यांनी सांगितले.

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, जातीय तेढ कोणी जाणीवपूर्वक करत असेल आणि त्यात कोणी दोषी आढळलं तर त्यावर कारवाई करण्यात येईलअसे दिलीप वळसे (Dilip Walase Patil) पाटील यांनी सांगितले. त्यात आज होणाऱ्या वर्षावरील बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा : 

Saurabh Tripathi : केंद्रीय संस्थांच्या नावाने राज्यातील सनदी अधिकारी उकळतात हप्ते

‘शरद पवार यांचे आभार कारण मी त्यांच्यामुळे डॉक्टर झालो’

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणा-या धर्मांध शक्तींना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले : बाळासाहेब थोरात 

Giving statements against Sharad Pawar a favourite trend, says Maharashtra HM Dilip Walse-Patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी