31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

कोल्हापूरकरांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

टीम लय भारी

कोल्हापूर : राज्यात काल (४ जुलै २०२२) पासून पावसाने जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापुरात देखील काल पासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत एका रात्रीत ७ फूट इतकी वाढ झाली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूरकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २४ फुटांच्या वर पोहोचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सोमवारपासून कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे कोल्हापुरातील नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.

जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याआधी २०१९ आणि २०२१ मध्ये कोल्हापुरात पूर आला होता. त्यावेळी अनेक लोक बेघर देखील झाली होती. त्यामुळे एका दिवसाच्या पावसानेच जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :

राज्यात पुन्हा ‘मुसळधार’चा हाहाकार?

राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

चरणमाळ घाटात ब्रेक निकामी झाल्याने बस अपघात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी