32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्ही कधी चैत्यभूमीवर गेला आहात का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रश्न

तुम्ही कधी चैत्यभूमीवर गेला आहात का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना प्रश्न

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी आव्हाड राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारले आहे. राज ठाकरे तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भरभरुन बोलता पण कधी चैत्यभूमीवर का असा सवाल त्यांनी विचारला आहे. पुढे ते म्हणतात की, आम्ही देवळात जाताना कॅमेरे घेऊन जात नाही असा ही टोला त्यांनी लगावला आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे, की पुस्तक वाचायची असतात. इतिहासाला खेळवू नका असं ही त्यांनी म्हटलं आहे. 

Dr. Jitendra Awhad strongly criticizes the opposition

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्या सभेवर भाष्य केले आहे. आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी अनेक ट्विट केलं आहे. केवळ राज ठाकरे नाही तर त्यांनी भाजपच्या बुस्टर डोस सभेवर टीका केली आहे. Dr. Jitendra Awhad strongly criticizes the opposition

डॉ. जितेंद्र आव्हाड  (Dr. Jitendra Awhad)  यांनी विरोधकांनावर टीका करत काही ट्विट केले आहे. देव कणाकणात आहे त्याची चर्चा सोडा! लोकशाहीच्या मंदिरातील जनता जनार्दन नावाच्या देवाची चिंता करा! ह्या देवाचा श्वास कोंडला आहे परिस्थीमुळे, महागाईचा डोंगर त्या देवावर कोसळला आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी असे म्हटलं होते की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी 1818 मधील एका लिखाणाचा संदर्भ दिला आहे.

या पत्रात  शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला नाही, असा दावा केला आहे. याबाबत आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.

 

हे सुद्धा वाचा : 

 भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- जितेंद्र आव्हाडांची खोचक टिका

Punjab HC Stays Arrest of Former AAP Leader Kumar Vishwas Over Alleged ‘Inflammatory Remarks’ on Kejriwal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी