33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रDr. Nitin Raut : डॉ. नितीन राऊत धावले मोदी सरकारच्या मदतीला

Dr. Nitin Raut : डॉ. नितीन राऊत धावले मोदी सरकारच्या मदतीला

टीम लय भारी

मुंबई : नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरात मेणबत्त्या, पणत्या पेटविण्याचा कार्यक्रम रविवारी आटोपला. या नऊ मिनिटांच्या कालावधीत विजेचा घोटाळा होऊ शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. परंतु राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) व अधिकाऱ्यांनी मोदी सरकारला वेळीच सावध केले. एवढेच नव्हे तर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री राजकुमार सिंग यांनाही वीज व्यवस्था कोलमडू नये म्हणून मार्गदर्शन सुद्धा केले. डॉ. राऊत ( Dr. Nitin Raut ) यांच्या या समयसुचकतेमुळे महाराष्ट्रात विजेचा अनर्थ घडला नाहीच, पण देशसुद्धा वीज संकटातून बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे वीज बंद करण्याचे मोदी यांनी आवाहन केले होते. अशा वेळी अचानक विजेची मागणी घटली तर ग्रीड फेल्युअरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे वीज यंत्रणा कोलमडू शकते अशी शक्यता डॉ. राऊत यांनी अगोदरच व्यक्त केली होती. डॉ. राऊत ( Dr. Nitin Raut ) यांच्यानंतर इतर राज्यातील वीज मंडळे आणि केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्याचे अधिकारी व मंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली होती.

केंद्रीय ऊर्जा मंत्री सिंग यांनी राऊत यांच्याशी चर्चा केली. राऊत ( Dr. Nitin Raut ) यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारने मेणबत्त्या इव्हेन्टविषयी मागदर्शन सुचना जारी केली होती. त्यानुसार फक्त विजेचे दिवे बंद करा. पंखा, फ्रिज यासारख्या विजेच्या वस्तू बंद करू नका अशी सुचना केंद्राने नागरिकांना केली होती.

महाराष्ट्रातील विजेची मागणी १५०० मेगा वॅटने घटली होती

मेणबत्त्या इव्हेन्टच्या अगोदर ११,४१० मेगा वॅट असलेली वीज इव्हेन्टच्या ९ मिनिटे कालावधीत ९,९३१ मेगावॅटवर घसरली होती. विजेच्या मागणीत घट होऊ शकते हे गृहीत धरून वीज अभियंत्यांनी अगोदरच तयारी केली होती. त्यानुसार या कालावधीत ग्रीडची फ्रिक्वेन्सी ५०.१८ ते ५०.२३ मेगा वॅटवर नियंत्रित केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात ग्रीड फेल्युअर झाले नाही. महाराष्ट्राने केलेल्या या उपाययोजनांचे अनुकरण इतर राज्यांनीही केले होते. त्यामुळे महाराष्ट्राने देशाला अंधारात जाण्यापासून वाचविल्याचे सूत्रांनी सांगितले.

डॉ. नितीन राऊत यांचे प्रयत्न आले फळाला

ग्रीड फेल्युअर होऊ नये म्हणून डॉ. नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) यांनी ऊर्जा खात्याच्या प्रमुख चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले होते. ऊर्जा खात्यातील ४०,००० तंत्रज्ञांशी सज्ज राहण्यास सांगितले होते. कोयना वीज केंद्रालाही सतर्कतेचे आदेश दिले होते. स्वतः नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) नागपूरच्या वीज कार्यालयात बसून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. डॉ. राऊत, ऊर्जा खात्याचे अधिकारी, अभियंते व इतर तंत्रज्ञ या सगळ्यांनी कष्ट घेतल्यामुळे वीज यंत्रणेत बिघाड झाला नाही. डॉ. राऊत ( Dr. Nitin Raut ) यांनी सावधगिरी बाळगून पद्धतशीर नियोजन केले. त्यामुळे त्यांचे प्रयत्न फळाला आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : देवेंद्र फडणवीस यांना रेशनिंगचे लाभार्थी व्हायचे आहे का ? : काँग्रेसने फटकारले

Lockdown21 : समाजात तेढ निर्माण करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला सोडणार नाही : पोलीस अधिक्षकांनी भरला दम

“Should Rethink”: Maharashtra Minister On PM’s Call To Turn Off Lights

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी